Home Maharashtra मुरुमाने भरलेले तिन ट्रॅक्टर तलाठी मुंडे यांनी सोडल्याने आंबोली गावात बनलाय खमंग...

मुरुमाने भरलेले तिन ट्रॅक्टर तलाठी मुंडे यांनी सोडल्याने आंबोली गावात बनलाय खमंग चर्चेचा विषय… — अवैध उत्खनन आणि आशिर्वाद!…

शुभम गजभिये

विशेष प्रतिनिधी…

          चिमूर तालुक्यातील आंबोली ते वाकर्ला रोडवर अवैध मुरुमाने भरलेले तीन ट्रॅक्टर तलाठी मुंडे यांनी जप्तीची कारवाही न करता सोडून दिल्याने आंबोली गावात चर्चेचा विषय बनला आहे.

            त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून दोषीवर कारवाई करावी,अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

         पाच फरवरी रोजी आंबोली निवासी शुभम मंडपे,नंदू ठाकरे व वासुदेव ठाकरे हे तिघे अवैधरित्या मुरूम व रेतीची तस्करी मोठ्या प्रमाणात करीत असल्याची माहिती वाकर्ला येथील तलाठी मुंडे यांना दिली.

         त्यानुसार तलाठी मुंडे यांनी आंबोली ते वाकर्ला मार्गे तिन ट्रॅक्टर हे मुरूम भरून येत असताना आपली दुचाकी आडवी करून रोडवर तिन्ही ट्रॅक्टर थांबविले.

        परंतु कोणतीही जप्तीची कारवाई न करता काही वेळानंतर ट्रॅक्टर सोडून दिल्याने या ट्रॅक्टर मालकात व तलाठी यांच्यात आर्थिक देवाण-घेवाण झाल्याची खमंग चर्चा आंबोली गावात सुरू आहे. 

       तिन्ही ट्रॅक्टर मालक हे आंबोली येथील असून त्यांचा राजकीय पक्षांशी सबंध असल्याचे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे,तद्वतच तिघांपैकी दोघे पदाधिकारी असल्याचे पुढे आले आहे.

           मात्र,सदर ते तिघेजण बऱ्याच वर्षापासून परिसरातील गौण खनिजांची तस्करी करीत असल्याची चर्चा सर्वत्र होत आहे.आपल्या राजकीय पदाचा फायदा घेऊन हे रेती तस्कर महसूल विभागालाही दाद देत नसून भर दिवसा व रात्र अवैधरित्या मुरम व वाळूचे उत्खनन करून व्यवसाय करतात असी लोकचर्चा आहे.

         मुरुम भरलेले ट्रॅक्टर पकडूनही वाकर्ला गावचे तलाठी मुंडे यांनी जप्तीची कारवाई न करता ट्रॅक्टर सोडून दिल्याने सध्या हा विषय परिसरात चर्चेचा बनला असून तलाठी मुंडे तसेच तिन्ही ट्रॅक्टर मालकांवर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्फत चौकशी करून योग्य कारवाई करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.