सन २०२३ – २४ खरीप पिकाची हंगामी पैसेवारी जाहीर…

ऋषी सहारे

संपादक

        गडचिरोली, दि.०७ : खरीप पिकाची हंगामी पैसेवारी तहसिलदार यांचेकडून प्राप्त माहितीचे आधारे संकलीत करुन गडचिरोली जिल्ह्याची सन २०२३- २०२४ या वर्षाची खरीप पिकाची हंगामी पैसेवारी जाहीर करण्यात येत आहे.

       गडचिरोली जिल्ह्यात एकूण १६८९ गावे असून खरीप पिकाची गावे १५४८ आहेत. व एकूण पिका खालील क्षेत्राच्या २/३ क्षेत्रामध्ये खरीप पिकाची पेरणी केलेल्या रब्बी गावांची संख्या ०८ आहेत. त्यापैकी खरीप गावामध्ये पीके नसलेली गांवे ५२ आहेत.

          सदर खरीप पिक असलेल्या गावांपैकी ५० पैशाचे आत पैसेवारी असलेले • असून ५० पैशाचे वर पैसेवारी असलेल्या एकूण खरीप पिक असलेल्या गावांची संख्या १५०४ आहेत. अशा प्रकारे एकूण १५०४ खरीप पिक असलेल्या गावाची पैसेवारी जाहीर केलेली आहे. गडचिरोली जिल्ह्याची खरीप हंगाम २०२३-२०२४ या वर्षाची हंगामी पैसेवारी ही ०.७१ आहे असे जिल्हाधिकारी, गडचिरोली यांनी कळविले आहे.