आळंदीत संत ज्ञानेश्वर माऊली व भगवान श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा…

दिनेश कुऱ्हाडे

उपसंपादक

आळंदी : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या जन्मोत्सव व श्री कृष्णजन्मोस्तव गोकुळाष्टमी उत्सव या निमित्ताने आळंदी येथील संत ज्ञानेश्वर संजीवन मंदिरात प्रथा परंपरा यांचे पालन करत संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरात साजरा करण्यात आला. माऊलींच्या जन्मोत्सव निमित्त माऊली मंदिरात हजारो भाविक भक्त आळंदी ग्रामस्थ बहूसंख्येने उपस्थित होते. मंदिरा मध्ये गाभाऱ्यात आकर्षक अशी पुष्पसजावट व मंदिर परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली होती.‌ गोकुळाष्टमीनिमित्त श्रीकृष्ण आणि संत ज्ञानेश्वर महाराज जन्मोत्सवानिमित्त कीर्तन सेवेसाठी परंपरेने मानकरी संतोष मोझे यांच्यावतीने डॉ.नारायण महाराज जाधव यांचे हृदयस्पर्शी मधुर वाणीतून कीर्तन सेवा पंखामंडपात संपन्न झाली तसेच विणा मंडपात आळंदीकर गावकरी भजन दरम्यान एकाच सुरु वेळी झाले. 

        विश्वस्त विकास ढगे पाटील यांच्या हस्ते गोकुळ पुजा करण्यात आली. संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधीवर भगवान श्रीकृष्णाचे रुप साकारले गेले.संत ज्ञानेश्वर महाराज जन्मोत्सव ठिक मध्यरात्री बारा वाजता समाधीवर पुष्पवृष्टी करण्यात आली.तदनंतर माऊलींची आरती होऊन सुंठवडा प्रसाद, उपवासाची खिरापत उपस्थित असलेल्या सर्व भाविकांना वाटण्यात आली. यावेळी माऊलींचे मानकरी व सेवेकरी यांना आळंदी देवस्थानच्यावतीने नारळ प्रसाद वाटप झाले. यावेळी संस्थानचे विश्वस्त विकास ढगे पाटील, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, बाळासाहेब चोपदार, राजाभाऊ चोपदार, माउलींचे मानकरी राहुल चिताळकर पा. योगीराज कुऱ्हाडे पा.योगेश आरु, स्वप्निल कुऱ्हाडे, ऋषीकेष पवार, चैतन्य महाराज कबीरबुवा, नरहरी महाराज चौधरी व वारकरी मंडळी,भाविक भक्त उपस्थित होते.