Home Vidarbha विद्यार्थ्यानी समाजाच्या हिताचे कार्य करावे :- नगराध्यक्ष श्रीमती गिताताई लिंगायत…

विद्यार्थ्यानी समाजाच्या हिताचे कार्य करावे :- नगराध्यक्ष श्रीमती गिताताई लिंगायत…

      रामदास ठुसे

नागपूर विभागीय प्रतिनिधी….

   चिमूर /- स्थानिक गांधी सेवा शिक्षण समिती द्वारा संचालित राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालय,चिमूर येथे विद्यार्थी विकास विभागाद्वारे वार्षिकोत्सव -2026 चे दिनांक 06 ते 08 दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. 

       दिनांक 06 ला वार्षिकोत्सव 2026 चे उदघाटन उत्साहात संपन्न झाले.यावेळी उद्घाटक म्हणून चिमूर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष श्रीमती गिताताई लिंगायत होत्या.विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाल्या की,आजच्या तरुणांनी उच्च शिक्षीत झाले पाहिजे.त्यांनी व्यक्तीमत्व विकास करावा.पण समाजाच्या उन्नतीचा

विचार करावा.समाजासाठी अहोरात्र राबले पाहीजे.तसेच उच्च पदावर गेल्यावर सुध्दा नम्र असावे असे विशद केले.

       वार्षिकोत्सव- 2026 उदघाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष गांधी सेवा शिक्षण समितीचे अध्यक्ष डॉ.दिपक यावले होते.त्यांनी आपल्या मार्गदर्शनात म्हटले की विद्यार्थ्याच्या कलागुणांना वाव देण्यासाठी वार्षिकोत्सव कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.विद्यार्थ्यानी व्यक्त झाले पाहिजे,मनाचा कोंडमारा करु नये असे सांगितले. 

       प्रमुख अतिथी म्हणून गांधी सेवा शिक्षण समितीचे कोषाध्यक्ष प्रा.महादेवराव पिसे यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की,विद्यार्थ्यांनी नुसतेच शिक्षीत होऊ नये तर सुशिक्षीत झाले पाहीजे.

        कार्यकारी प्राचार्य लेप्टनंट डॉ.प्रफुल्ल बन्सोड यांनी वार्षिकोत्सव 2025- 2026 सांस्कृतिक कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाला गांधी सेवा शिक्षण समितीचे सचिव प्रा. मारोतराव भोयर,सहसचिव कुंदनजी बारापात्रे,सेवानिवृत प्रा.वरभे,प्रा.मेश्राम अतिथी म्हणून उपस्थित होते.

        कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.निलिमा तुराणकर यांनी केले तर प्रास्ताविक विद्यार्थी विकास विभागाचे प्रभारी डॉ.नितिन कत्रोजवार यांनी केले.याचबरोबर आभार कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. राकेश कुमरे यांनी केले.

      विद्यार्थी विकास विभागाचे प्रा.डॉ.पितांबर पिसे,शारिरिक शिक्षण संचालक प्रा.डॉ.उदय मेंढूलकर,प्रा.दुर्योधन रोकडे यांनी विशेष परिश्रम घेतले.या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राध्यापकवर्ग,शिक्षकेतर कर्मचारी,तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.