उपक्षम रामटेके
मुख्य कार्यकारी अधिकारी…
सेमाना विद्या व वनविकास प्रशिक्षण मंडळ,गडचिरोली,द्वारे संचालित ग्रामगीता महाविद्यालय,चिमूर येथे दिनांक 6 मार्च 2026 रोजी,माजी विद्यार्थी सभा आणि पालक-शिक्षक सभा हे संयुक्तपणे आयोजित करण्यात आले होते.
महाविद्यालयातील माजी विद्यार्थी आणि पालक शिक्षक सभांचे आयोजन हे विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती,हजेरी,परीक्षेतील कामगिरी आणि सर्वांगीण विकासावर चर्चा करण्यासाठी नियमितपणे दरवर्षी केले जाते.
या सभांमधून शिक्षक आणि पालकांमध्ये संवाद साधला जातो,तसेच माजी विद्यार्थी नोकरीच्या संधी आणि अनुभवाची देवाणघेवाण करून महाविद्यालयाच्या विकासात सहभाग घेतात.
दरवर्षीप्रमाणे आयोजित या संयुक्त सभेत अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाची प्राचार्या डॉ. सुनंदा आस्वले,तसेच प्रमुख पाहुणे म्हणून माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष श्री.राहुल मस्कर आणि पालक प्रतिनिधी श्री.दिलीप धोंगडे उपस्थित होते.
याप्रसंगी व्यासपीठावर माजी विद्यार्थी समितीचे समन्वयक डॉ.नागेश ढोरे,पालक-शिक्षक समितीचे समन्वयक डॉ.बिजनकुमार शील आणि आयक्यूएसी समन्वयक डॉ.निलेश ठवकर उपस्थित होते.
या सभेत मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले,तसेच विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी सुधारणावादी उपायांवर आणि महाविद्यालयात उपलब्ध शैक्षणिक सोयी सुविधांवर चर्चा करण्यात आली.
माजी विद्यार्थ्यांसोबत चर्चा करत असताना नोकरीच्या संधी, करियर मार्गदर्शन आणि कॅम्पस प्लेसमेंटसाठी सहकार्य मिळवण्यावर भर देण्यात आला.
या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.सुनंदा आस्वले यांनी माजी विद्यार्थी आणि पालकांद्वारे विचारलेले विविध प्रश्नांची समाधानकारक उत्तरे दिले.
या कार्यक्रमाचे संचालन डॉ.बिजनकुमार शील यांनी तर आभार प्रदर्शन प्रा.संदीप मेश्राम यांनी केले.या सभेत मोठ्या संख्येने माजी विद्यार्थी आणि पालक,तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.



