Home Maharashtra छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीरला प्रारंभ!..  — राजूरा तालुक्यातील गोवरी...

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीरला प्रारंभ!..  — राजूरा तालुक्यातील गोवरी येथे चंद्रपूर जिल्हाधिकारी विनय गौडा यांची उपस्थिती…

उपक्षम रामटेके/शुभम गजभिये..

      राजुरा तालुक्यातील गोवरी या गावातून छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान टप्पा एक कार्यक्रमाची आजपासून सुरुवात झाली.

     चंद्रपूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांची प्रामुख्याने यावेळी उपस्थिती लाभली होती.

       कार्यक्रमाच्या सुरुवातीला राजूराचे उपविभागीय अधिकारी रविंद्र माने यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून शिबिराला प्रारंभ झाला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाषण राजूराचे तहसिलदार ओमप्रकाश गोंड यांनी केले.

       त्यानंतर विविध विभागांच्या विभाग प्रमुख यांनी त्यांच्या विभागाच्या योजनांबद्दल सविस्तर माहिती दिली.कार्यक्रमाचे उद्घाटक तथा अध्यक्ष यांनी आपले मार्गदर्शनपर भाषण केले. 

         कार्यक्रमाला जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी उपस्थित राहून सर्व अधिकारी,कर्मचारी व उपस्थित नागरिकांचा उत्साह वाढविला.

         उपरोक्त शिबिरात सामाजिक अर्थसहाय्य योजना नवीन लाभार्थी निवड आदेश,नवीन रेशन कार्ड,जात प्रमाणपत्र सह विविध दाखले,वर्ग 1 करण्यात आलेल्या जमिनीचे 7/12,दुरुस्ती करण्यात आलेले 7/12 आदिंचे लाभ प्रत्यक्ष लाभार्थी यांना वाटप करण्यात आले.तसेच विविध योजना संदर्भात नव्याने अर्ज स्वीकारण्यात आले.

           यावेळी चंद्रपूर जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले व जास्तीत जास्त संख्येने सहभागी होऊन हे अभियान यशस्वी करण्याचे आवाहन केले.यावेळी व्यासपीठावर गट विकास अधिकारी भागवत,रेजिवाड भूमिअभिलेखचे उपअधीक्षक दत्तू सोनवणे,पशुधन विकास अधिकारी तेलंगे,राजुराचे नायब तहसीलदार चंद्रशेखर तेलंग,प्रविण गावंडे,श्रीमती पवार,गोवारी ग्रामपंचायतच्या सरपंच आशाताई उरकुडे यांच्यासह ग्रामपंचायतीचे सरपंच नंदकिशोर वाढई,बंधू कोडापे,वनमाला कातकर,पांडुरंग पोटे तसेच गोवरी मंडळातील सर्व तलाठी,गोवरी सर्कलच्या मंडळ अधिकारी वनिता रामटेके,शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.