शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
चिमूर तालुक्यातील मौजा सावरी (बिड.) येथे आरो फिल्टर लावण्याची मागणी सरपंच लोकनाथ रामटेके यांनी चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे.
मौजा सावरी (बिड) येथील नागरिकांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळावे यासाठी सरपंच लोकनाथ रामटेके आरो फिल्टर लावण्याची चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केलेली मागणी रास्त असल्याचे म्हणणे तेथील नागरिकांचे आहे.
मौजा सावरी (बिड) येथे आरो फिल्टर लावण्याच्या मागणीकडे चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे काळजीपूर्वक लक्ष देणार काय?हा प्रश्न अतिशय गंभीर आहे.
सरपंच लोकनाथ रामटेके यांनी सिईओ चंद्रपूर यांच्याकडे आरो फिल्टर लावण्याची केलेली मागणी जिवनावश्यक आहे.यामुळे चंद्रपूर सिईओ यांच्या निर्णयाची प्रतीक्षा मौजा सावरी (बिड) येथील नागरिकांना आहे.



