बु.रामरावजी खंडारे बहुउद्देशीय समाज विकास संस्थेत महापरिनिर्वाण दिन संपन्न.

युवराज डोंगरे-खल्लार..

     उपसंपादक 

        नजिकच्या उपराई येथील बु. रामरावजी खंडारे समाज विकास संस्थेत भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्त आदरांजली अर्पण करून संस्थेच्या कार्यालयात महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले. 

          यावेळी कार्यक्रमाला उपस्थित संस्थेचे अध्यक्ष राहुल सुरेशराव खंडारे यांनी भारतरत्न, विश्वभुषण,भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले तथा बाबासाहेबांच्या विचारांवर प्रकाश टाकते वेळी प्रत्येकांचे हक्क व अधिकार अबाधित रहावे व समता,स्वातंत्र्य,बंधुत्व आणि न्यायाला अनुसरून समाज घडवा यासाठी सर्व नागरिकांचे हक्क भारतीय संविधानात अंतर्भूत केले.यामुळे या देशावर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे उपकार आहेत.त्यांनी विविध अंगांनी युगप्रवर्तक डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या उपकारांची जाणीव करून दिली.

         गावातील प्रतिष्ठित नागरिक किसनराव भानुदासजी राऊत,डी.वाय.खंडारे,बी.डी.खंडारे,डी.वंजारी,एस.आर.खंडारे जेष्ठ नागरिक,चंद्रकलाबाई बि.खंडारे,बी.एस.खंडारे तसेच नवतरुण कुलदीप खंडारे हे कार्यक्रमाला उपस्थित होते.

             डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन ज्येष्ठ नागरिक सुरेशराव खंडारे यांच्या हस्ते करण्यात आले आणि महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

        शेवटी कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या मान्यवरांचे व इतरांचे,आभार,संस्थेच्या वतीने संस्थेचे सदस्य भुषण खंडारे यांनी मानले..