खल्लार हायस्कुल खल्लार येथे तालुकास्तरीय पावसाळी क्रिडा स्पर्धा…

 

युवराज डोंगरे/खल्लार

    उपसंपादक 

 अमरावती विभाग..

          खल्लार हायस्कुल खल्लार येथे दि 5 सप्टेंबर व 6 सप्टेंबर असे दोन दिवस तालुकास्तरीय क्रिडा स्पर्धेचे आयोजन खल्लार हायस्कुलच्या क्रीडांगणावर करण्यात आले होते.

              दोन दिवसीय तालुकास्तरीय पावसाळी क्रिडा स्पर्धेत तालुक्यातील विविध शाळेतील संघांनी भाग घेतला होता.

          यात 17 वर्षीय मुले खो खो स्पर्धेत रत्नाबाई राठी हायस्कुल दर्यापूरचा संघ विजेता ठरला तर श्री शिवाजी हायस्कुल रामतीर्थचा संघ उपविजेता ठरला.17 वर्षीय मुलींच्या विजयी संघात श्री शिवाजी हायस्कुल,रामतीर्थने बाजी मारली असून रत्नाबाई राठी हायस्कुल, दर्यापूर हा संघ उपविजेता झाला.

        14 वर्षीय मुले विजयी संघ खल्लार हायस्कुल खल्लार तर उपविजयी संघ शासकीय आश्रमशाळा सामदा झालेत तर 14 वर्षीय मुलींच्या स्पर्धेत नजमा पटेल उर्दू हायस्कुल बाभळी हा संघ विजेता झाला असून महर्षी वाल्मिकी हायस्कुल सामदा हा संघ उपविजेता ठरला आहे.

           तर 19 वर्षीय मुले खो खो स्पर्धेत खल्लार हायस्कुल व कनिष्ठ कला महाविद्यालयाचा संघ विजेता ठरला आहे.

          सर्व विजेता व उपविजेता संघाचे खल्लार हायस्कुल व कनिष्ठ कला महाविद्यालयाच्या वतीने स्वागत करुन कौतुक करण्यात आले आहे.