प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ आणि उज्वला फाऊंडेशनच्या निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर…

 

प्रितम जनबंधु

संपादक 

 

सिंधुदुर्ग : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, महाराष्ट्र राज्य जिल्हा शाखा सिंधुदुर्ग व उज्वला फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव २०२३-२४ अभियाना अंतर्गत शालेय व सहशालेय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्या निबंध स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. कु. तन्वी राजेंद्र कदम (कोट कामते), प्रथम, कु. प्राची संभाजी परब (कट्टा ), व्दितीय कु ऐश्वर्या संभाजी परब (कट्टा ) तृतीय तर कु. समीर दीपक पालव (कट्टा ), कु. तेजस्वी शरद वायगणकर (पावशी ) कु. राजकुमार आनंद दुखंडे (कट्टा ) यांनी उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त केले. 

              या सर्व विजेता व सहभागी विद्यार्थ्यांचे प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष श्री डी. टी. आंबेगावे, उज्ज्वल फाऊंडेशन महाराष्ट्र राज्यच्या अध्यक्षा भारती गावडे, प्रे. सं. व. पं. सेवा संघाचे कोकण संघटक व उज्ज्वल फाऊंडेंशनचे सचिव श्री श्रीराम कदम, कोकण अध्यक्ष जयप्रकाश पवार, महिला अध्यक्षा दिपिकाताई चिपळूणकर, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष श्री गोपाळ पावसकर, उज्ज्वल फाऊंडेशनचे खजिनदार श्री सिद्धेश मसुरकर, प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे सचिव श्री प्रणित पालव, उपाध्यक्ष श्री. भिकाजी गावडे, प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे पदाधिकारी श्री. शशांक कुमठेकर, जिल्हा संपर्क प्रमुख श्री. संजय मांजरेकर, उज्ज्वल फाऊंडेशनच्या सदस्या श्रावणी कदम, सुप्रिया सांडे, प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे सर्व पदाधिकारी या सर्वांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.