छत्रपती शिवाजी कला महाविद्यालय, आसेगाव पूर्णा येथे शिक्षक दिन संपन्न.

 

युवराज डोंगरे/खल्लार

      उपसंपादक

         छत्रपती शिवाजी कला महाविद्यालय,आसेगाव पूर्णा येथे मंगळवार दिनांक ५ सप्टेंबर २०२३ रोजी राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने शिक्षक दिन संपन्न झाला.सुरुवातीला मान्यवरांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन प्रतिमेचे पूजन व हारार्रापण केले.कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक डॉ.भारत कल्याणकर यांनी याप्रसंगी सांगितले की, भारताचे माजी राष्ट्रपती व तत्वचिंतक अभ्यासक डॉ.सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा आज जन्मदिन हा दिवस आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो. कलकत्ता विद्यापीठात तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केले, कालांतराने ऑक्सफर्ड मँचेस्टर कॉलेजमध्ये तुलनात्मक धर्मशास्त्राचे प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केले.

         तसेच राष्ट्रसंघात भारताचे प्रतिनिधी म्हणून काम पाहिले, रशियाचे राजदूत म्हणूनही त्यांनी काम केले अखिल भारतीय तत्त्वज्ञान परिषद व अखिल भारतीय शिक्षण परिषदेचे अध्यक्षीय स्थान त्यांनी भूषविले. पहिल्या शिक्षण आयोगाचे अध्यक्ष असताना त्यांनी मूल्य शिक्षणावर जास्त भर देतं भारतीय संस्कृतीला साजेसा विद्यार्थी निर्माण व्हावा या दृष्टीने प्रयत्न केले. तसेच माणुसकी निर्माण करणारे हे शिक्षणाचे उद्दिष्ट असावे शिक्षणाचे ध्येय हे केवळ ज्ञान माहिती व तंत्र देणे हे नसून त्याचा प्रारंभ उद्देश प्रेम दयाभाव व सदगुणांना उत्तेजन देणे द्वेष व निर्भयता दूर करणे तसेच माणसाच्या मनात परिवर्तन घडविले पाहिजे. विद्यार्थ्यांमध्ये नैतिक जबाबदारी ची जाणीव करून देऊन त्यांना सुसंस्कृत नागरिक बनविणे हेच शिक्षणाचे ध्येय होय. तसेच येणाऱ्या काळात शिक्षणातील आव्हाने विद्यार्थ्यांनी ओळखून त्यावर मात केली पाहिजे असे प्रतिपादन केले.

          आजच्या कार्यक्रमाचे प्रभारी प्राचार्य डॉ.हरीष काळे यांनी सांगितले की, माणुसकी जोपासणारे शिक्षण हवे ते शिक्षणाचे ध्येय असावे. शिक्षण आणि चारित्र्य निर्मिती यांचा संबंध शिक्षण संस्कारातून चारित्र्यवान व्यक्ती निर्माण झाले पाहिजे शिक्षणाचे स्वरूप बदलत असल्यामुळे शिक्षकांच्या भूमिकेत व कार्यात बदल अपेक्षित आहे. विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासाला सहाय्य करण्याची जबाबदारी शिक्षकांची आहे, सर्वसामान्य माणसापेक्षा शिक्षक हा निर्माता,रचनाकार,शिल्पकार,असल्याने त्याला तत्त्वज्ञानाची अधिक आवश्यकता आहे. नवीन पिढी निर्माण करण्याची जबाबदारी शिक्षिकाची असल्याने त्याचा विचार उच्चार व त्याचे आचार तात्विक अधिष्ठान यांची नितांत आवश्यकता आहे. शिक्षण म्हणजे केवळ साक्षर निर्माण करायचे नसून माणूस निर्माण करायचे आहे. तसेच विद्यार्थी जीवनात शिस्त असणे आवश्यक आहे असे प्रतिपादन केले.

           महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उस्फूर्तपणे सहभाग घेऊन स्वयंशासित महाविद्यालय चालविले त्यामध्ये अनेक विद्यार्थीनी शिक्षिका व शिक्षक तसेच तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांची भूमिका पार पडली. यामध्ये मनीषा पारीसे,साक्षी कांबळे, आचल नाचोने,साक्षी नान्हे,वैष्णवी ठाकरे, पायल गवई,अश्विनी पचारे, आचल प्रजापती,धनश्री देशमुख, निकिता राऊत,पूजा भटकर,गायत्री मानकर,विवेक धाकडे, प्रज्वल प्रजापती,अतुल सोळंके, शुभम आमझरे,रोशन प्रजापती, आर्यन पठाण,रोहित राऊत. यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.

           या कार्यक्रमाचे आयोजन व प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ.आशिष काळे यांनी केले. सूत्रसंचालन तनुजा बोबडे आभार सिद्धी सोळके हिने केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता महाविद्यालयाचे प्रा.डॉ. रवींद्र इचे डॉ. प्रवीण सदार श्री.दिनेश वाटाणे तसेच विद्यार्थी व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यांनी अथक परिश्रम घेतले.