पवार गटाकडून राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक दिपक मानकर यांची पुणे शहराध्यक्ष पदी निवड…

दिनेश कुऱ्हाडे

उपसंपादक

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या विरोधात बंड पुकारल्यानंतर राष्ट्रवादीत दोन गट पडले आहेत. अजित पवार यांनी थेट राष्ट्रवादीवर दावा ठोकल्यानंतर शरद पवारांना मोठा धक्का बसला आहे.

       तसेच पक्षविरोधी कारवाया केल्याप्रकरणी आता राष्ट्रवादीकडून अजित पवारांना पाठिंबा देणाऱ्या नेत्यांवर बडतर्फेंची कारवाई केली जात आहे. तर यातच आता पुणे शहाराध्यक्ष पदासाठी अजित पवार यांच्या गटाकडून मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे.

        राष्ट्रवादीचे शहाराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी शरद पवार यांना पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे आता अजित पवार गटाकडून राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक दिपक मानकर यांची निवड करण्याची शक्यता आहे. त्यांची आज अजित पवार गटाकडून अधिकृत घोषणा होण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. तर दुसऱ्या बाजूला पुणे महिला शहाराध्यक्षपदी रूपाली पाटील यांच्याकडे जबाबदारी देण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.