पृथ्वी आणि जीवन सुरक्षित ठेवण्यासाठी सुरक्षित पर्यावरणाची गरज. – अनिल किरणापुरे

 

संजय टेंभुर्णे 

कार्यकारी संपादक

दखल न्यूज भारत 

 जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य

नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था तालुका शाखा साकोली , जिल्हा शाखा भंडारा व वनविभाग साकोली च्या वतीने जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाप्रसंगी पर्यावरणाविषयी गीत ,घोषवाक्य, देऊन वन विभागाला अनेक फळझाडांचे बियाणे झाडांचे बियाणे देण्यात आले. पर्यावरणाविषयी सखोल माहिती देण्यात आली.

         कार्यक्रमाचे अध्यक्ष -हेमकृष्णा कापगते माजी आमदार प्रमुख मार्गदर्शक -इंजि.घनश्याम निखाडे नेफडो नागपूर विभागीय सचिव ,एम.एस.चौव्हाण मॕडम आरएफओ साकोली ,अनिल किरणापूरे नेफडो तालुका सचिव प्रमुख अतिथी-इंद्रायनी कापगते ,सुनिल खांडेकर आरओ साकोली ,प्रिती डोंगरवार नेफडो जिल्हा महिला अध्यक्षा ,के.एस.रंगारी नेफडो जिल्हा संघटक ,साकोली तालुका उपाध्यक्ष पुरुषोत्तम टेंभुर्णे ,पुष्पा कापगते महिला सचिव ,नितेश रंगारी लाईफ,एस.जी.जाधव वनरक्षक ,जी.एस.गुरबेले वनपाल,महिला संघटक संगिता खुणे,उर्मिला निखारे,जयश्री भानारकर ,वर्षा तरजुले ,शहर सचिव सकून गि-हेपुंजे ,कुंदा मुंगुलमारे ,भारती हातझाडे ,प्रज्ञा दिरबुडे,दिपक मेश्राम .भुमीता धकाते,

       कार्यक्रमाचे मार्गदर्शन करताना अनिल किरणापुरे म्हणाले की,पृथ्वीवर अनेक जीव जंतू, पक्षी, प्राणी, वनस्पती, कीटक वास्तव्य करत आहेत, त्यात सर्वात महत्वाचा घटक म्हणजे मानव प्राणी! की, ज्यामुळे सर्वाधिक प्रमाणात पर्यावरणाचा र्‍हास होतो, जो या सर्व गोष्टींना सर्वाधिक जबाबदार आहे. सुरूवातीपासूनच मानवाने आपल्या गरजा भागविण्यासाठी सर्वस्वी निसर्गावरच ताण दिलेला आहे.

           त्यातच आपल्या गरजा भागवत असताना त्याचा पर्यावरण इतर सजीव सृष्टीवर काय परिणाम होईल याकडे कधी जाणीवपुर्वक पाहिलेच नाही, स्वतःला अन्न भाजून-शिजवून खाण्यासाठी अग्नीचा शोध लावला, खर्‍या अर्थाने तेथपासूनच पर्यावरणामध्ये प्रदुषणास सुरूवात केली होती मानवाने, मात्र त्यावेळी त्याचे प्रमाण अत्यल्प होते. जसजसा मानवाच्या मेंदूचा विकास होत गेला, तसा त्याने औद्योगिकीकरणाचा शोध लावला, उद्योगधंदे सुरू झाले, कारखानदारी वाढली, तसेच प्रदुषण वाढण्यास चांगलाच हातभार लागत गेला, आणि आज भरमसाठ कारखानदारी वाढलेली आपणास पहावयास मिळत आहे, आपण बोलतो की, चांगला विकास झाला आहे, मात्र या कारखान्यांमधून बाहेर पडणारा काळा कुट्ट धूर ज्यामध्ये असणारा कार्बन डायऑक्साईड संपूर्ण सजीव जातीच्या आरोग्यासाठी अतिहाणीकारक आहे, याचा आपण कधी जाणीवपूर्वक विचार करण्यासच तयार नसू तर आपले जीवन धोक्यात आहे, हे आपण जाणले पाहिजे.

        म्हणून झाडे लावणे अत्यंत महत्त्वाचे आहे आपण आपल्या घरी आपले वाढदिवस,लग्नाचे वाढदिवस साजरे करताना केक न कापता झाडे लावून त्यांचे संवर्धन करुन वाढदिवस साजरा केलं पाहिजे असे ते बोलत होते.

कार्यक्रमाचे प्रास्तविक -यशवंत उपरीकर नागपूर विभागीय उपाध्यक्ष कार्यक्रमाचे सूत्रसंचालन -के.एस.रंगारी भंडारा जिल्हा संघटक 

कार्यक्रमाचे आभार -कल्पना सांगोडे साकोली तालुका महिला अध्यक्षा .