प्रतिभावंत प्रबोधनकार कला साहित्य संघटना साकोली ची सभा संपन्न.

नागपूर विभागीय प्रतिनिधी-ऋग्वेद येवले

साकोली -आज शासकीय विश्राम गृह साकोली येथे प्रतिभावंत प्रबोधनकार कला साहित्य संघटनेच्या वतीने विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते.

     त्या मध्ये 26 जून 2023 ला राजर्षी शाहू महाराज जयंती निमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

    कलावंतांची संघटना सुद्धा सामाजिक कार्यात अग्रेसर आहे आपली एक सामाजिक जिम्मेदारी समजून रक्तदान करू गरजूवंतांना जीवनदान देऊ अस आजच्या सभेमध्ये सर्वानु मते ठरविण्यात आले

     या बैठकीला जिल्हा अध्यक्ष भावेश कोटांगले तालुका उपाध्यक्ष संजय टेम्भुरने, कोषाध्यक्ष मनोहर गंथाळे, साकोली संघटनेचे संचालक धनंजय धकाते, अरविंद शिवणकर, संदीप नागदेवे, रोहित मांढरे, निलाराम बागडे, अरविंद कांबळे, बालू भुजाडे, उपस्थित होते.