शिक्षक सहकारी पतसंस्था निवडणूक,पतसंस्थेच्या विकासामुळे समता पॅनलची सरशी…

 

 

युवराज डोंगरे 

उपसंपादक

दर्यापूर पंचायत समिती शिक्षक सहकारी पतसंस्थेची निवडणूक येत्या 2 जुलै 2023 रविवारला होणार आहे.त्यामध्ये नव्या जुन्या उमेदवारांचा समावेश करून सर्व जाती-धर्माला संधी देणारे सर्वसमावेशित समता पॅनल निवडणुकीमध्ये उभे आहे.

समता पॅनल तर्फे सर्वसाधारण मतदार संघातून अशोक बावनेर, दिलीप खंडारे, संजय साखरे, बाळकृष्ण पावडे, गजानन गणोदे दिगांबर जामनिक प्रमोद कुरळकर, संजय जोशी, प्रशांत गहले, दिनेश देशमुख, कैलास डहाळे, सुनील स्वर्गीय, महिला मतदारसंघातून कु.अर्चना वाटाणे सौ.होले व कु.सुवर्णा ढोरे सौ.रायबोले तसेच इतर मागासवर्ग मतदार संघातून अशोक बावनेर किंवा ज्ञानदेव उर्फ संजय साखरे,अनुसूचित जाती जमाती मतदारसंघातून विनायक चव्हाण किंवा दिगांबर जामनिक तर विमुक्त भटक्या, वि.मा. प्रवर्ग मतदार संघातून बाळकृष्ण पावडे किंवा सुनील घुसे यांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले.

यापूर्वीही समता पॅनलने दहा वर्ष स्थिर व पारदर्शक प्रशासन चालविले सभासदांच्या पैशांचा सुयोग वापर करून व्याजदर कमी करणे, कर्ज मर्यादा वाढविणे, अतिरिक्त होणाऱ्या खर्चाला आळा घालणे, लाभांशाचा टक्का वाढविणे व निवृत्त होणाऱ्या सभासदांकरिता कर्जाची तरतूद करणे इत्यादी मुख्य मुद्द्यांवर समता पॅनल निवडणुकीच्या रिंगणात उभे आहे.

सोमवार ला समता पॅनलच्या उमेदवारांनी उमेदवारी समता पॅनलचे अध्यक्ष प्रकाश धजेकर ज्येष्ठ मार्गदर्शक पंडितराव देशमुख, किशोर मुंदे, रत्नाकर करूले,अनिल रुद्रकार,राजेंद्र मालोकार,विजय पवार ,सुरेंद्र पतिंगे,विलास पेठे ,सतीश वानखडे,राजेंद्र सावरकर,संजय नागे,धनराज साखरे,अरुण चव्हाण,सतीश नांदणे, विनोद अवकाळे, भारत माहुरे,सुरेश धांडगे,राजेश शर्मा,मधुकर चव्हाण,विजय ठाकरे, प्रफुल्ल बिजवे,हरिदास ठाकरे,संजय कळसकर,गजेंद्र बावनेर,रवींद्र झाकर्डे, रावसाहेब होले,अशोक गावंडे,धनराज चांदुरकर,दिनेश मंडवे,प्रदीप रुपनारायण,बाळासाहेब रायबोले,चरणदास कोलटक्के, वासुदेव मेमनकर,संतोष पवार,मंगेश ब्रम्हखेडे,धरमदास चव्हाण,प्रभाकर कडू,सौ सारिका पवार,सौ.शिला जामनिक,सौ भारती पेठे, सौ.वैशाली चांदुरकर,सीमा पातुर्डे इत्यादी मान्यवरांच्या उपस्थित सर्व उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले व याप्रसंगी समता पॅनलच्या सर्व उमेदवारांना बहुमतांनी विजय करण्याचे आवाहन मतदारांना करण्यात आले आहे.