दर्यापूर महावितरणची तत्परता जागृती कॉलनीतील रात्री अकरा वाजता खंडित झालेला विजपुरवठा केला सुरळीत….

 

युवराज डोंगरे 

उपसंपादक

       दर्यापूर महावितरण नेहमीच कौतुकास्पद कामगिरी राहिली आहे तर अनेकांनी दिलेल्या तक्रारी सुद्धा क्रमाने निवारण करण्यात आल्या तर आज रात्री अकरा वाजताच्या सुमारास खांबावरील अर्थीग पार्किंग झाल्याने जागृती कॉलनी मधील काही घरातील वीज पुरवठा खंडित झाला होता तर येथील नागरिकांनी महावितरणशी संपर्क साधताच चेतन माहोकार उप अभियंता महावितरण यांच्या नेतृत्वात महावितरण कर्मचारी शरद पाटील सपकाळ व वैभव पाटील शेंडे परेश कात्रे ,रोशन सावरकर,स अभियंता सोपान गायधने,सह इतर कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेत आपल्या कार्याची प्रत्यक्ष पावती रात्री दिली वेळेवर इलेक्ट्रिक साहित्याची जुळवा जुळव करून विद्युत पुरवठा काही क्षणातच सुरळीत केला यावेळी जागृती कॉलनी मधील नागरिकांनी महावितरण कर्मचारी व अभियंता चेतन मोहोकार यांचे आभार व्यक्त केले.