आर्थिक कुवत नसलेल्या गरीब रुग्णांना मदत करणारे अजयभाऊ कंकडालवार यांचे सदभावनापुर्वक खुल्ले मन नेहमीच हृदयस्पर्शी… — त्यांचे कर्तव्य जनतेच्या कल्याणासाठी..

 

    डॉ.जगदीश वेन्नम

          संपादक

      

 गडचिरोली:-

       सर्व नागरिकांना आपले समजून आर्थिक व इतर प्रकारची मदत करणारे कर्तव्य हे जागरूक कर्मामध्ये मोडते.गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार हे सातत्याने गोरगरीब जनतेच्या मदतीला वेळ न गमावता धावून जातात.त्यांचे सहहृदयस्पर्शी कर्तव्य मनात घर करून जातय.त्यांच्या सारखे सरळ व संवेदनशील व्यक्तित्व दुसरे नाही..

       स्वतःच्या खिशाला कात्री लावून जिल्ह्यातील व अहेरी विधानसभा क्षेत्रातील गरीब रुग्णांसाठी निरंतर आर्थिक मदत करणारे निःस्वार्थ, सेवाभावी म्हणून आदिवासी विद्यार्थी संघाचे नेते,माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या सामाजिक कार्याला अख्या जिल्ह्यातच आजच्या घडीला तरी तोड नाही.

       शहरी भागात गरीब रुग्णांच्या मदतीला अनेक सामाजिक संस्था,सेवाभावी समाजसेवक पुढे येतांना दिसून येतात.मात्र ग्रामीण भागात असे मदतीचे नाममात्र उदाहरण आपल्याला ऐकायला येतात.

       शहरी भागात सुरू असलेल्या सामाजिक संस्था व सेवाभावी वृत्तीचे समाजसेवकांच्या हाताने होत असलेल्या गरीब रुग्णांच्या रुग्णसेवेची जणूकाही वसा घेऊनच का होईना पण आज सर्वपरिचित असलेलं अजयभाऊ कंकडालवार नावाचा असामान्य चेहरा जिल्ह्यातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या गरिबांसाठी देवमाणूस ठरू लागलंय.

       स्वतःच्या पाठीमागे सत्ता नावाचं ‘बिरुद’ असो किंवा नसो पण हा सर्वसामान्य चेहरा आपद्ग्रस्त व संकटग्रस्तांसाठी देवधुतच ठरू लागलंय.आपल्या स्वतःच्या सामाजिक कार्याच्या प्रसिद्धीपासून लांब असलेल्या अज्जूभाऊ नावाचं आता सर्व सामान्य नागरिकांच्या मनात घर करून बसलय.

           अशा कार्य पध्दतीचा सर्वसामान्य चेहरा म्हणजे सेवभावी कर्मच समजा.स्वतःच्या कार्यकर्त्यांना करणारी मदत म्हणजे ‘उजव्या हाताने दिलेले दान… डाव्या हातालाही’कधीही कळू देत नाही असी त्यांची कार्यपद्धत.. . खूपच मोठेपणाची! 

      जिल्ह्यात अनेक नामवंत राजकीय व सामाजिक कार्यकर्ते आहेत.परंतु या सगळ्यांच्या तुलनेत अज्जूभाऊचं सामाजिक कार्य हे निराळेच आहे.शोषित, वंचित व पीडित व गरजूंचे अश्रू पुसण्यात अजयभाऊंचे हात हे नेहमीच पुढे असतात ..हे विशेष…

       त्यांच्या सारखे सखोल समजूतदार व संवेदनशील व्यक्तित्व गडचिरोली जिल्ह्याला लाभने हे आम गोरगरीब जनतेचे उत्तम भाग्यच..!