नेहरु युवा केंद्राद्वारे युवा उत्सवचे आयोजन..

 

डॉ.जगदिश वेन्नम

    संपादक 

  गडचिरोली,(जिमाका)दि.06: नेहरु युवा केंद्र, गडचिरोली, युवा कार्यक्रम आणि खेळ मंत्रालय, भारत सरकारद्वारे युवा उत्सव 2023 चे आयोजन दिनांक 07 जुन 2023 रोजी सकाळी 10.00 वा. कृषी महाविद्यालय, आय.टी.आय. चौक, गडचिरोली येथे होणार असून कार्यक्रमाचे उद्घाटन गडचिरोली – चिमुर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते व प्रभारी जिल्हाधिकारी धनाजी पाटील यांच्या हस्ते होणार आहे.

     यावेळी विविध सामुहिक सांस्कृतिक कार्यक्रम, भाषण स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, कविता स्पर्धा, फोटोग्राफी स्पर्धा (मोबाईल) असे विविध स्पर्धेचे आयोजन होणार असून जास्तीत जास्त संख्येने स्पर्धेकांनी स्पर्धेत सहभागी व्हावे असे नेहरु युवा केंद्राद्वारे आवाहन करण्यात आले आहे.