1947 ले भारताला स्वातंत्र्य मिळाले,याचा अर्थ या आधी इंग्रज,मुगल,अब्दाली,पृथ्वीराज चव्हाण,राणप्रताप,शिवाजी महाराज,टिपू सुलतान इत्यादींची राजेशाही होती.हा राजकीय इतिहास होय.
यावेळी सरंजामशाही होती,इंग्रजांच्या काळात सरंजामशाही संपुष्टात येऊन भांडवलशाही सुरू झाली,भांडवलशाही व्यवस्थेने सरंजामशाही व्यवस्था संपुष्टात आणून भांडवलशाही आणि लोकशाही व्यवस्था निर्माण केली.
लोकशाही ही लोकांच्या रेट्यातून निर्माण झाली.इंग्रजांच्या काळात व्यवस्था भांडवली होती,पण सत्ता मात्र राजेशाहीचीच होती.याचा अर्थ आर्थिक व्यवस्था भांडवली होती आणि राजकीय व्यवस्था ही हुकुमशाहीचीच म्हणजे राजाचीच होती.
तरी या राजाने आपल्या हाती सत्ता ठेऊनच लोकशाही प्रथा सुरू केली,म्हणजेच निवडणुकीच्या मार्गाने प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळ,लोकसभा अस्तित्वात आणली.याचा अर्थ खरी लोकशाही नव्हती तर राज्यशाहीतील ही लोकशाही होती.मंत्रिमंडळ बरखास्त करण्याचा अधिकार राज्याला होता.व्हिक्टोरिया राणीला होता.
सामाजिक आणि धार्मिक व्यवस्था ही विषमतावादी होती,ती मनुस्मृति नुसार चालत होती,शिक्षण,न्याय,आरोग्य,संपती,अन्न सुरक्षा,जनतेच्या जीविताची हमी,याचा हक्क जनतेस बहुजनास नव्हता.
मानवी हक्क आणि अधिकार मिळवण्यासाठी भारतीय स्वातंत्र्याची लढाई झाली.यात लाखो लोकांनी इंग्रज सैन्य,पोलिसच्या लाठ्या गोळ्या अंगावर झेलले,जेल मध्ये गेले,शेकडो ची हत्या झाली,तेंव्हा कुठे भरताला स्वातंत्र्य मिळाले.भारतीय जनतेच्या हाती सत्ता आली.
लढाऊ जनतेचे आणि या लढाईचे नेतृत्व करणाऱ्यांचे स्वप्न केवळ स्वातंत्र्य मिळविणे,लोकशाही आणणे,सत्ता बदलणे एव्हढ्या पुरतेच मर्यादित नव्हते,तर त्यांचे मुख्य स्वप्न होते “व्यवस्था परिवर्तन.” म्हणजेच विषमतेची व्यवस्था बदलून समतेची व्यवस्था प्रस्थापित करणे.
गरीबी श्रीमंतीत असलेली दारितील अंतर कमी करणे,धार्मिक व्यवस्था बदलण्यासाठी लोकात वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणे,धर्मातील कर्मकांड,अंधश्रद्धा,आर्थिक शोषण,भाबडेपणा,देवभोळेपणा,चमत्कार,नरबळी,पशुहत्या अशा दुष्ट रूढी परंपरा बदलणे.
सामाजिक विषमता बदलण्यासाठी जातिनिर्मुलन,जातीची उतरंड फोडणे तोडणे,अस्पृश्यता नष्ट करणे,जाती धर्माचा गर्व नष्ट करणे,गर्वसे काहो हम हिंदू है,मुस्लिम है,हे नारे विसर्जित करणे,लोकशाही,समाजवाद,धर्मनिरपेक्षतेची व्यवस्था निर्माण करणे,या समतावादी व्यवस्था निर्माणासाठीच स्वातंत्र्यसैनिकांनी,आणि स्वातंत्र्याची लढाईचे नेतृत्व करणाऱ्यांनी स्वप्न पाहिले होते.
आज 2026 साल,77 वर्ष झाले,स्वातंत्र्य मिळून,तरी व्यवस्था बदलली नाही,थोडाफार फरक पडला,पण संपूर्ण व्यवस्था बदललेली नाही.
संत,महात्मे,महामानव यांच्या विचारांचे संविधान डॉ.आंबेडकरांनी बनविले.परंतु संविधानाची अंमलबजावणी निवडून गेलेल्या पुढाऱ्यांनी,मंत्रिमंडळानी म्हणजेच सरकारनी केली नाही.याचे कारण निवडून जाणारे सर्वच विषमतावादीच आहेत,अशा नाच जनता निवडून देते.
म्हणून निष्कर्ष हा की,संविधान समतावादी आहे पण व्यवस्था पूर्वीसारखीच विषमतावादी आहे,मनुस्मृति ऐवजी संविधान हा बदल झाला,पण संविधानाप्रमाणे व्यवस्था बदलेली नाही.
संविधान पुरोगामी,परिवर्तनवादी,क्रांतिकारी आहे,पण व्यवस्था मात्र मनुस्मृतीचीच आहे.
यावर उपाय बाबासाहेबांनी सांगितला तो हा की,जनतेनी संघटित होऊन संविधानातील हक्क अधिकार हे सरकारशी भांडून,झगडून,रस्त्यावरची लढाई करून,कायद्याची लढाई करून जनतेनीच संविधान अमलात आणावे.
निवडून गेलेले लोक संविधान अमलात आणतील याची खात्री देता येत नाही.कारण हे प्रतिनिधी भांडवलदार,जमीनदारांच्या मर्जीतील असतात,त्यांचे गुलाम असतात,म्हणून गुलाम गुलामाला मानवीहक्क अधिकारी देऊ शकत नाही,तर गुलामानी ते संघटित होऊन,संघर्ष करून मिळवावे लागतात.
शिवाय भांडवलदार,जमीनदार,श्रीमंत वर्ग यांचे विरोधात संघर्ष करावा लागतो,तरच संविधान अमलात येईल,विषमतावादी व्यवस्था नष्ट होईल.


