दर्यापूर शहरा मधील शाळा कॉलेज समोरील मुख्य रस्त्यावर गतिरोधक बसविण्यात यावे, युवासेनेची मागणी.

युवराज डोंगरे 

 खल्लार/प्रतिनिधी

दर्यापूर मधील नुकतेच मुख्य रस्त्याचे डांबरीकरण बरेच दिवसापासून झालेले असून वाहन चालक बेशिस्तपणे भर घाव वेगाने वाहने चालवीत आहेत. दर्यापूर ते अमरावती रोड, दर्यापूर ते मुर्तीजापुर रोड, दर्यापूर ते अकोट रोड इत्यादी मुख्य रस्ते असून या रस्त्याने वाहनांची वरझड खूप वेगाने होत आहे सर्वात जास्त शाळा महाविद्यालय या रस्त्यावर आहेत.. परिणामी येथील विद्यार्थ्यांच्या जिवितास धोका निर्माण झाला आहे. पंचायत समिती रोड, तहसील रोड, बस स्टँड रोड हे सर्व जोड रस्ते मुख्य रस्त्याला जोडलेले आहेत, मुख्य रस्त्यावर वाहने वेगाने जात असल्याने या जोड रस्त्यावरून मुख्य रस्त्यावर येणाऱ्या वाहनांचे होणारे छोटे-मोठे अपघात नित्याची बाब झाली आहे, या जोड रस्त्याची माहिती देणारे फलक या ठिकाणी नाहीत डांबरीकरण करताना एका ठिकाणी असलेले रबरी गतिरोधक काढले गेले आहेत तर उर्वरित गतिरोधक निघून गेले आहेत तीव्र उताराच्या रस्त्यावर कोणतेही गतिरोधक नसल्याने वाहन चालक वाहने स्वरात चालवतात या मुख्य रस्त्यावर चढ रस्त्याच्या अगोदर डांबर यांचे गतिरोधक करण्याची तसेच माहिती फलक बसविण्याची मागणी युवासेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षा च्या वतीने मुख्याधिकारी नगरपरिषद कार्यालय दर्यापूर यांना लेखी स्वरुपात मागणी केली आहे.

या वेळी शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे युवासेना उपजिल्हाप्रमुख अंकुश पाटील कावडकर,सागर वडतकर,निलेश पारडे,सतीश जामनिक,मनोज लोखंडे,नितीन माहुरे,स्वप्नील विल्हेकर, गणेश पारवे, विशाल बगाडे,मनोज लाड,पिंटू कात्रे,गणेश डहाळे,आशिष वानखडे, शुभम गवई तसेच युवासैनिक उपस्थित होते.