शहरातील विविध प्रभागात् खंब्यांना त्वरित पथदिवे लावा…. — आम आदमी पार्टी चे मुख्याधिकारी याना निवेदन…

 

 उमेश कांबळे ता प्र भद्रावती – 

       दिनांक 5 एप्रिल ला आम आदमी पार्टी भद्रावती तर्फे शहरातील विविध प्रभागात् खंब्यांना त्वरित पथदिवे लावा याबाबत मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले. 

      भद्रावती शहरातील दुर्गम भागात काही वार्डांमध्ये काही दिवसापासुन पथदिवे लावण्यासाठी खांव लावण्यात् आले पण त्या खंब्यांना नगरपालिके तर्फे पथदिवे लावण्यात आलेले नाही. काही दुर्गम भागात नागरिकाना रात्रोच्या वेळी अंधारात रस्त्या वरून ये जा करताना वा फिरताना कमलीचा त्रास सहन करावा लागतो. या विषयाचे निवेदन घेऊन त्वरित या खंब्यांना पथदिवे लावण्यात यावे. ही गंभीर समस्या प्रशासनाने लवकरात लवकर न सोडवल्यास आम आदमी पार्टी तर्फे लाईट विना खांब आंदोलन करुन होणारी प्रशासनाची चुक जनते समोर दाखवेल असा इशारा निवेदनातून देण्यात आला. सदर निवेदन देताना आम आदमी पार्टी चे शहर अध्यक्ष सूरज शहा, तालुकाध्यक्ष सोनाल पाटील, तालुका कोषाध्यक्ष राजकुमार चट्टे, शहर उपाध्यक्ष सुमित हस्तक ,शहर संघटन मंत्री अनिल कुमार राम, सहसचिव सचिन पाटील, शहर सदस्य बालू भाऊ बांदुरकर, मंगेश भाऊ खंडाळे तसेच इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.