बाळासाहेब सुतार
निरा नरसिंहपुर प्रतिनिधी
पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर गावचे ग्रामदैवत पीरसाहेब बाबा मंदिराची सालाबाद प्रमाणे होणाऱी यात्रा (उरूस) यासाठी कार्यकर्ते व गावातील ग्रामस्थान उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
चालू वर्षी यात्रेला चांगलाच भाविकांचा व ग्रामस्थांचा प्रतिसाद मिळणार आहे.
गावातील कार्यकर्ते व ग्रामस्थांच्या सहकार्याने सर्वच भक्तांच्या सहभागातून यंदाही यात्रा (उरूस) मोठ्या श्रद्धा-भक्तीने साजरा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे,,
सोमवार दिनांक 9 मर्च रोजी संदल. दुसऱ्या दिवशी मंगळवार दिनांक 10 मार्च रोजी मुख्य यात्रा (उरूस)
तिसऱ्या दिवशी बुधवार 11मार्च रोजी यात्रा मोठ्या प्रमाणात भरलेली असते.
दुपारी 3 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत निकाली कुस्त्या झाल्यानंतर देवाचा मानाचा घोडा घेऊन मंदिर प्रदक्षिणा घेतल्यानंतर आलेल्या सर्व भाविकांना महाप्रसाद व श्रीफळ देऊन यात्रेची सांगता होत असते.
यात्रे निमित्त गावातील मंदिर परिसराची संपूर्ण गावची स्वच्छता, यात्रेकरूंन पिण्यासाठी स्वच्छ पाणी, मंदिराला रंगरंगोटी मंडप तसेच विद्युत रोषणाईची कामे पूर्ण झालेली आहेत.
पिंपरी बुद्रुक ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच, उपसरपंच, आजी-माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष, विविध संस्थांचे आजी-माजी चेअरमन, व्हाईस चेअरमन, शिक्षण संस्था अध्यक्ष, उपाध्यक्ष, पिरसाहेब यात्रा कमिटी, शिवशक्ती तरुण मंडळ, राजमुद्रा ग्रुप, अनेक क्षेत्रातील संघटनेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष ग्रामसेवक, ग्रामपंचायत कर्मचारी, यांच्यासह सर्व कार्यकर्त्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने यात्रेच्या (उरूसाच्या) जबाबदाऱ्या घेतलेल्या आहेत.
ग्रामस्थांनी स्वयंप्रेरणेने देणग्या जमा करून कार्यक्रमासाठी आवश्यक व्यवस्था केली आहे. पीरसाहेब मंदिराला मंडप संपूर्ण विद्युत रोषणाई व मिरवणुकीसाठी फटाके, हलगी लेझीम व ढोल-ताशा पथक, देवासाठी फुलांची सजावटी सह तयारी केली आहे.
सर्व धर्मीय समाज व नागरिक या उत्सवात सहभागी होतात, हीच या परंपरेची खास वैशिष्ट्ये आहेत.
यंदाची यात्रा (उरूस) शांततेत आणि उत्साहात पार पडावा, यासाठी ग्रामपंचायत व पंचक्रोशीतील ग्रामस्थ यांच्या कडूनही आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. गावकऱ्यांमध्ये यात्रा (उरूसाबाबत) प्रचंड उत्साह असून मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.



