Home Social मनस्वी व्हाॅट्सअप गृपच्या मुख्य संयोजिकापदी ॲड.प्रेरणा सहारे तर सहसंयोजिकापदी पूजा पाटील! 

मनस्वी व्हाॅट्सअप गृपच्या मुख्य संयोजिकापदी ॲड.प्रेरणा सहारे तर सहसंयोजिकापदी पूजा पाटील! 

शुभम गजभिये

  विशेष प्रतिनिधी

चंद्रपूर :- समाजातील महिला व तरुणींच्या कलागुणांना वाव मिळावा हा उद्दात हेतू डोळ्यासमोर ठेवून नुकतीच मनस्वी व्हाॅट्सअप गृपची निर्मिती करण्यात आली.

         या गृपच्या मुख्य संयोजिकापदी चंद्रपूरच्या ॲड.प्रेरणा भास्कर सहारे यांची निवड तर सहसंयोजिकापदी सोलापूर जिल्ह्यातील सौंदणे येथील विधी विद्यार्थींनी पूजा पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

        या नवोदित व्हाॅट्सअप गृपला मुख्य मार्गदर्शिका म्हणून सुरतच्या जेष्ठ प्राध्यापिका राजश्री पाटील व नागपूरच्या प्रा.वैशाली राऊत राहणार असल्याचे सहज सुचलंच्या मुख्य मार्गदर्शिका माया कोसरे व अधिवक्ता मेघा धोटे यांनी आज सांगितले.