स्पर्धा परीक्षा देणे खूप मोठी अडचण नाही- तहसीलदार निलेश कदम… — एन. पी. के. विद्यालयात तीन दिवसीय स्नेहसंमेलन संपन्न…

     ऋग्वेद येवले

नागपूर विभागीय प्रतिनिधी

    साकोली – स्पर्धा परीक्षा देणे खूप मोठी अडचण नसून प्रयत्न करीत राहणे गरजेचे आहे. प्रयत्नाशिवाय काहीही शक्य नाही. या वयात विद्यार्थी विकासात्मक रूटवर असतो विद्यार्थ्यांनी योग्य निर्णय घेणे व वरिष्ठांचे मार्गदर्शन घेत राहिले पाहिजे असे प्रतिपादन साकोलीचे तहसीलदार निलेश कदम यांनी केले. ते नंदलाल पाटील कापगते विद्यालय तथा विज्ञान आणि एम सी व्ही सी कनिष्ठ महाविद्यालय येथे तीन दिवसीय स्नेहसंमेलन समारोप सोहळ्यात अध्यक्ष स्थानावरून बोलले.

         स्वर्गीय नंदलाल पाटील कापगते जन्मशताब्दी वर्षानिमित्त या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. वार्षिकोत्सव सोहळ्याला उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. संदीप लाभांडे तर उद्घाटक म्हणून माजी आमदार डॉ. हेमकृष्ण कापगते उपस्थित होते.

             यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य गौरीशंकर सलामे, नगर परिषदेचे स्वप्निल हमाने, माजी पंचायत समिती उपसभापती वैजयंती कापगते ,नागझिरा अभयारण्याचे आर. एम .बोहरे ज्येष्ठ पत्रकार अशोक गुप्ता, आशिष चेडगे, डी‌.जी. रंगारी, रवी भोंगाणे , ऋग्वेद येवले, माजी नगरसेवक रवी परशुरामकर, माजी नगरसेवक मनीष कापगते, डॉ. गजानन डोंगरवार तसेच संस्थांतर्गत सर्व शाळांचे प्राचार्य प्राध्यापक निवृत्त शिक्षक मुरलीधर गजापुरे ,संजय कापगते, प्रदीप गोमासे ,डी.डी. कोसलकर, विनायक बाळबुद्धे इत्यादी मान्यवर उपस्थित होते वार्षिकोत्सवाचे औचित्य साधून श्याम वार्षिकाकांचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. यावेळी विविध दात्यांकडून गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिक देण्यात आले.

             याप्रसंगी वार्षिकोत्सव विद्यार्थिनी प्रतिनिधी समीक्षा मेश्राम व हिमांशी अंबुले यांनी वार्षिकोत्सव अहवालाचे वाचन केले तसेच कला वेशभूषेत संगीतमय प्रस्तुती सादर केली गेली.

            ४ डिसेंबरला समारोपीय कार्यक्रम घेण्यात आला यात विविध स्पर्धांमध्ये भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते उत्कृष्ट पारितोषिक देऊन गौरविण्यात आला. यावेळी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष तहसीलदार निलेश कदम, आगारप्रमुख सचिन आगरकर, माजी आमदार हेमकृष्ण कापगते, गजानन डोंगरवार,शिक्षक पालक उपाध्यक्ष पद्माकर पारधी, मुख्याध्यापिका पोहणे मॅडम, पत्रकार मनीषा काशिवार ,प्राचार्य के.डी. लांजेवार, पी.बी .बोरकर, के .एम कापगते ,आर.बी. कापगते ,एम. एम. कापगते व इतर मान्यवर उपस्थित होते.

         प्रास्ताविक विद्यालयाचे प्राचार्य किशोर डोये यांनी केले तसेच सूत्रसंचालन के.जी. लोथे व धनंजय तुमसरे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राध्यापक कापगते मॅडम यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.