स्व.श्यामरावबापू कापगते प्रतिष्ठानतर्फे शिक्षक पुरस्काराचे वितरण…

     ऋग्वेद येवले

नागपूर विभागीय प्रतिनिधी 

साकोली – स्व. शामरावबापू कापगते प्रतिष्ठान तर्फे दरवर्षी विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांना गौरविण्यात येते यामध्ये जीवनगौरव व राष्ट्रसेवा, मातोश्री महिला, पत्रकारिता, साहित्य, शिक्षक ,कला, युवक, शेतकरी, युवती ,वनश्री गौरक्षण, सेवावृत्ती, वैद्यकीय, खेळाडू, श्रमिक, इत्यादी पुरस्कार प्रदान करण्यात येते.

        यात ४ डिसेंबरला एन.पी.के. विद्यालयात झालेल्या स्नेहसंमेलनात 12 शिक्षकांना शिक्षक पुरस्कार देण्यात आला.यावेळी शामराव बापू कापगते प्रतिष्ठानचे अध्यक्ष गजानन डोंगरवार, माजी आमदार हेमकृष्ण कापगते, आगारप्रमुख सचिन आगरकर, तहसीलदार निलेश कदम व अनेक मान्यवर उपस्थित होते.

          यावर्षी शिक्षक पुरस्कार के.जी.लोथे, एम.सी.वी.सी विभाग, के.एम. कापगते हायस्कूल विभाग,आर.व्हि. दिघोरे जूनियर विभाग ,सौ एस.एन.गहाणे ज्युनिअर विभाग, सौ.एन. वाय. कऱ्हाडे ज्युनियर विभाग, के.डी. लांजेवार शामानंद विद्यालय महालगाव ,बी.एस.हातझाडे लालबहादूर विद्यालय गोंडउमरी, एस.एस.मेश्राम श्यामाप्रसाद विद्यालय महालगाव,सौ.व्हि.जी.पोहाणे, टिळक विद्यालय खंडाळा,एस. एन.चुटे पगाजी विद्यालय कोलारी ,पी .एल. वैद्य महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय किन्ही इत्यादींना मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.