नागपूर येथील नाट्य महोत्सवात साकोली संघाचे नेतृत्व भावेश कोटांगले व विनोद मुरकुटे करणार…

    ऋग्वेद येवले

नागपूर विभागीय प्रतिनिधी

         साकोली -महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ नागपूर विभागाच्या वतीने ६९ व नाट्य महोत्सव प्राथमिक स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे, त्या ठिकाणी कामगार कल्याण केंद्र साकोली चे नेतृत्व भावेश कोटांगले व विनोद मुरकुटे आणि संच करणार आहे.

             ही नाट्य महोत्सव स्पर्धा १ डिसेंबर २०२३ ते २५ डिसेंबर २०२३ पर्यत आयोजित करण्यात आलेली आहे. त्यामध्ये ८ डिसेंबर२०२३ ला कामगार कल्याण केंद्र साकोली केंद्र संचालक सतीश कुटे यांच्या नेतृत्वात दोन अंकी नाटक संगीत त्याग मातृत्वाचा ही नाटक सादर होणार आहे. या नाटकाचे लेखक चंद्रशेखर श्राद्धे असून नाटकाचे दिग्दर्शक भावेश कोटांगले आणि नाट्य संकल्पना सूत्रधार विनोद मुरकुटे यांनी केली आहे

        कामगार कल्याण भवन,राजे रघूजी नगर नागपूर येथे त्याग मातृत्वाचा या नाटकाचे सादरीकरण सायंकाळी ७ वाजता निशुल्क सादर होणार आहे.

             यामध्ये मुख्य कलाकार विनोद मुरकुटे, भावेश कोटांगले, चंद्रशेखर श्राध्ये, यशवंत गायकवाड, ईश्वर धकाते, यशवंत बागडे,सुभाष परशुरामकर, स्त्री कलावंत अर्चना कान्हेकर, वनश्री श्राध्ये, माधवी गेडाम, संगीत संच सोनू मेश्राम, वसंता राऊत,पार्श्वसंगीत संदीप कोटांगले, नेपथ्य मनोहर बोरकर,प्रकाश योजना बालू भुजाडे सहभागी होणार आहेत.