Home Social पर्यावरणाचं संरक्षण आणि संवर्धन करणे हिच काळाची खरी गरज : नितीन गोरे…

पर्यावरणाचं संरक्षण आणि संवर्धन करणे हिच काळाची खरी गरज : नितीन गोरे…

दिनेश कुऱ्हाडे 

   उपसंपादक 

पुणे : पर्यावरणाला आणि मानवी पर्यावरणाचं संरक्षण आणि संवर्धन करणे हिच काळाची खरी गरज आरोग्याला हानिकारक असलेल्या प्लास्टिक चा वापर टाळून कापडी पिशव्यांचा वापर करण्याचे आवाहन त्यांनी केले. प्लास्टिक चे विघटन करणे शक्य नाही परंतु परिसरातील शाळांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या घरातील दैनंदिन वापरातील प्लास्टिकचे आठवड्याच्या दर शनिवारी त्यांच्या द्वारे शाळेत संकलन करुन संबंधित उद्योगांना कच्चा माल म्हणुन पुरवून प्लास्टिक चा पुनर्वापर होऊ शकतो, पर्यावरणाचं संरक्षण आणि संवर्धन करणे हिच काळाची खरी गरज आहे असे मत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य नितीन गोरे व्यक्त केले.

        जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीज यांच्या संयुक्त विद्यमाने चाकण येथील OEN India Private Limited कंपनीच्या आवारात प्लास्टिक वापर व त्यापासून होणाऱ्या प्रदूषणाचे निर्मूलन या संकल्पनेतून जनजागृतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला यावेळी गोरे बोलत होते.

        यावेळी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे पुणे प्रादेशिक संचालक प्रतीक भरणे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य नितीन गोरे, उपप्रादेशिक अधिकारी बाबासाहेब कुकडे व नवनाथ अवताडे,फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीजचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप बटवाल,चाकण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ.अंकुश जाधव,आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी माधव खांडेकर तसेच पर्यावरण क्षेत्रातील व औद्योगिक क्षेत्रातील तज्ञ व्यक्ति उपस्थित होते.