दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी : श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या श्री ज्ञानेश्वर विद्यालय व ज्युनिअर कॉलेज मधील वृक्षारोपण समिती आणि ट्रायप्रो कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त औचित्य साधून विद्यालयात 25 वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले.याप्रसंगी संस्थेचे सचिव अजित वडगावकर, प्राचार्य सूर्यकांत मुंगसे, प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रदीप काळे, मुख्यालिपीका संगीता पाटील, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, कंपनीचे वरिष्ठ अधिकारी योगेश कुदळे, अक्षय औटी, तेजस मेमाणे, अभिषेक मुसारकर व इतर सर्व अधिकारी, कामगार उपस्थित होते.
वृक्षारोपण कार्यक्रमा संदर्भात बोलताना संस्थेचे सचिव अजित वडगावकर यांनी संत तुकाराम महाराजांच्या” वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे “या अभंगाचा दाखला देत कंपनीच्या वतीने विद्यालयामध्ये राबवलेल्या या उपक्रमाचे कौतुक करताना कंपनीच्या माध्यमातून वारीच्या वाटेवर रस्ता रुंदीकरणामुळे वृक्ष नसल्याने अशाच पद्धतीचे वृक्षारोपण आणि वृक्षाचे जतन आणि संवर्धन व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
याप्रसंगी कंपनीचे तेजस मेमाणे यांनी कंपनीच्या पर्यावरण जतनाच्या दृष्टिकोनातून सौरऊर्जा प्रकल्पाची माहिती देताना विद्यालयास सर्वतोपरी सहकार्य आणि मदत करण्याची ग्वाही दिली. रसिका पांडुरंग कुर्हाडे हिच्या पुढाकाराने हा उपक्रम साजरा झाला.



