पिंपरी बुद्रुक येथील लोकनेते महादेवराव बोडके दादा विद्यालयात दहावी एसएससी बोर्ड परीक्षेला प्रारंभ…. — चालू वर्षी एस,एस,सी बोर्ड परीक्षेसाठी 245 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला…

 बाळासाहेब सुतार 

निरा नरसिंहपुर प्रतिनिधी

         पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर येथील लोकनेते महादेवराव बोडकेदादा, विद्यालयात दहावी एस एससी बोर्ड परीक्षेला सुरुवात झाली. शुक्रवार दिनांक 1 /3 /2024 रोजी दहावी परीक्षेची पहिली प्रश्नपत्रिका मराठी विषया पासूनच सुरुवात झाली.

          परीक्षेच्या प्रारंभी विद्यालयाच्या संस्थापक अध्यक्षा सुभद्राताई बोडके, संचालक श्रीकांत बोडके,, माजी चेअरमन बबन बोडके, समाधान बोडके, सरपंच आबासाहेब बोडके, सरपंच सुदर्शन बोडके, माजी चेअरमन आशोक बोडके, दत्तू नाना बोडके ,प्रभाकर बोडके, माजी चेअरमन रामचंद्र लावंड, ऊप सरपंच पांडूदादा बोडके, नामदेव बोडके, सहित विद्यालयातील शिक्षकांच्या उपस्थितीत यशस्वी बोर्ड परीक्षेसाठी आलेल्या सर्वच विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत पहिल्या दिवसाचा पहिला पेपर मराठी विषया पासून सुरुवात झाली.

           परीक्षेच्या प्रारंभी सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन संस्थापक अध्यक्षा सुभद्राताई बोडके व संचालक श्रीकांत बोडके संचालक संजय बोडके यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून दहावीच्या बोर्ड परीक्षेला शुक्रवार पासून सुरुवात झाली.

           प्रतिमेच्या पूजन प्रसंगी संचालक श्रीकांत बोडके बोलत आसताना म्हणाले की सर्व विभागातील शिक्षक यांनी लोकनेते महादेवराव बोडके दादा विद्यालयाच्या नियमाचे पालन करून वेळेत प्रश्नपत्रिका देऊन वेळेतच विद्यार्थ्यांकडून सोडवून घेऊन जमा करून घेणे पुढील वर्षाचा निकाल हा चांगल्या प्रकारे लागला पाहिजे. विद्यार्थ्यांनी पूर्ण पेपर सोडवला का नाही ते पण पाहण्यासाठी विसरू नका.

          एस एससी परीक्षेसाठी पिंपरी बुद्रुक येथील लोकनेते महादेवराव बोडके दादा विद्यालयातील मुख्याध्यापक भरत कोरडकर सर यांची विद्यार्थी संख्या 55 तर चैतन्य विद्यालय नरसिंहपूर येथील मुख्याध्यापक शिवदास लोखंडे सर यांची विद्यार्थी संख्या 79 , गिरवी येथील माध्यमिक विद्यालय मुख्याध्यापक धनाजी शिंदे सर यांचे विद्यार्थी संख्या 52 तर नीरा नरसिंहपूर येथील शिवपार्वती इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य रविराज काकडे यांची विद्यार्थी संख्या 59 तर एकूण परीक्षेसाठी पात्र विद्यार्थी संख्या 245 विद्यार्थी व विद्यार्थिनी दहावी बोर्ड परीक्षेला बसलेले आहेत.

           परीक्षेचा कालावधी दिनांक 1 मार्च पासून ते दिनांक 26 मार्च पर्यंत परीक्षा घेण्यात येणार आहेत.

          असे विद्यालयाचे मुख्याध्यापक भरत कोरटकर सर यांनी यावेळी सांगितले.