चंद्रपूर लोकसभा… — ‘विजय’श्री करीताच ठरणार… — “शिवानीअस्त्र” वा “प्रतिभास्त्र”? राजरंग… प्रा. महेश पाणसे

 

         लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहेच. प्रत्येक पक्ष उमेदवाराची चाचपणी करीत आ हे. तर काही पक्षांमध्ये उमेदवारी मिळविण्यासाठी नेत्यांची फिल्डींग हाय लेव्हल वर सुरु आहे.

चंद़पूर- आणीं लोकसभा क्षेत्रात कडवी झुंज यंदाही अपेक्षेनुसार भा.ज.पा.व भारतीय राष्ट्रीय कांग्रेस मध्येच होणार हे निश्चित आहे. त्यातही गत लोकसभा निवडणुकीत सकल महाराष्ट्रात या क्षेत्रातून कांग्रेसचे ऐकमेव उमेदवार स्व.सुरेश धानोरकर निवडून आले होते.

        कांग्रेस विरहीत राज्याचा नारा देणाऱ्या भा.ज.पा.ला या क्षेत्रातील मतदारांनी रोखले होते हे विशेष.

       स्व.धानोरकर निवडून येण्यामागे अनेक कारणे असली तरी एरव्ही पकडापकडी करणारी जिल्यातील कांग्रेसची नेतेमंडळी एकत्रीत येऊन कामाला लागली होती हेही एक कारण होते.

           स्व.धानोरकरांच्या उमेदवारीपासून तर विजयश्री ओढुन आणेपर्यन्त विदयमान विधानसभा विरोधी पक्ष नेते ना.विजय वडेट्टीवार पुढे होते. 

          हयात असते तर स्व.धानोरकरांची उमेदवारी ही येत्या लोकसभा निवडणुकीत निश्चित होती हे वेगळे सांगायला नको. मात्र, आता धानोरकरांच्या स्वर्गवासानंतर चंद्रपूर लोकसभा क्षेत्रावर राजकिय महत्वकांक्षा जपणाऱ्या दबंग नेत्यांची कांग्रेस अंतर्गत उमेदवारीसाठी दावेदारी वाढल्याचे चित्र बघायला मिळत आहे.

       स्व.बाळूभाऊ धानोरकर यांच्या निधनानंतर पोटनिवडणुक झाली असती तर नैतिकतेच्या आधारावर  स्व. सुरेश धानोरकरांच्या पत्नी व कांग्रेसच्या विदयमान आमदार प्रतिभा धानोरकर यांची उमेदवारी निश्चित मानली जात होती.

          होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत चंद्रपूर लोकसभेकरीता आ. प्रतिभाताई धानोरकर यांनी दावेदारी पुढे करणे स्वाभाविक व क्रमप्राप्त असली तर भारी राजकिय महत्वाकांक्षा बाळगणारे वजनदार नेते विजयभाऊ वडेट्टीवार इतक्या सहजपणे पक्षाची लोकसभेची उमेदवारी आपल्या कंपूतून जाऊ देणार नाहीत असे जाणकारांना वाटते.

मध्यंतरी विजय वडेट्टीवारांनी चंद्रपूर लोकसभा उमेदवारीकरीता स्वनाव पुढे करुन आ.प्रतिभा धानोरकर यांना व त्यांच्या शुभचिंतकाना “कॉन्फयुज्ड”केले आहे.

        आता राजकिय वारसा लाभलेली वडेट्टीवारांची लेक शिवानी वडेट्टीवार यांच्या नावाची चर्चा अगदी उमेदवारीच्या तोंडावर सुरु झाल्याने व यावर पक्षाने वा दस्तुरखुद्द विरोधी पक्षनेत्यांनी अजूनतरी कुठलंही स्पष्ट खुलासा न दिल्याने चित्त बरेच बोलके दिसते.

         तसेही गत तिन वर्षांचे काळात कोण भारी ? यावर स्व. धानोरकर वविजयभाऊ वडेट्टीवार यांच्यात घमासान सुरु होते हे संपुर्ण विदभं जाणतो. 

          लोकसभेकरीता भा.ज.पा.तफै चर्चेनुसार ना.सुधीर मुनगंटीवार यांना उमेदवारी मिळाली तर मात्र स्वतः विजयभाऊ वडेट्टीवार मैदानात उतरणार नाहीत असे राजकिय जाणकार बोलतात. अशा वेळी ट्रायल म्हणून शिवानी वडेट्टीवार यांना पुढे करण्यात येऊ शकते.

        तसेही एवढयात शिवानीताई दबंग सत्ताधाऱ्यांशी भिडणे सुरु करून आपण ही सक्षम असल्याचे संकेत देताना दिसतात.

       आ. प्रतिभा धानोरकर गत ५ वर्षात लोकप्रतिनिधी म्हणून बऱ्यापैकी यशस्वी झालेल्या आहेत. स्व.धानोरकरांच्या निधनानंतर ज्या आत्मविश्वासाने आ. प्रतिभाताई यांनी आपले स्थान कायम केले ते बघता व चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात पक्षाचे भविष्य बघता त्यांचे नावाचा किती विचार होतो हे लवकरच कळेल.

           कांग्रेस पक्षाचे लोकसभा उमेदवारी वडेट्टीवार गटाला किंवा आ.धानोरकरांना मिळेल मात्र पक्षहितासाठी एकत्रपणे काम झाले तरच पक्षाचे भले होईल ही प्रामाणिक कार्यकर्त्याचीभावना दिसते.

सध्यातरी विरोधी पक्षनेते राज्याच्या पक्षीय राजकारणात भारी आहेत. शेवटी “शिवानी अस्त्र ” वा ” प्रतिभास्त्र ” की अजून कुठले अस्त्र असेल ते मात्र ” विजय”श्री करीताच .