सगुणाच्या “मदर डिलाइट “खाद्यतेलाच्या पैकिंगवर लाल थिकपक्यामुळे ग्राहकात संभ्रम..

  सैय्यद ज़ाकिर

जिल्हा प्रतिनिधी वर्धा..

हिगणघाट :– सगुना फ़ूड प्रॉडक्ट वनी (हिगणघाट )या कम्पनिचा सोयाबीन प्रकिया उधोग अनेक वर्षा पासून वसलेल्या आहे.कंपनीच्या वतीने या कारखण्याच्यामध्ये सोयबिनवर प्रक्रिया करूंन खाद्य तेल व अन्य उत्पादन घेतली जातात.

        भारतीय अन्न सुरक्षा व मानक प्राधिकारन्याच्या मार्गदर्शक नियमानुसार खाद्य पदार्थ निर्मिति व विक्री करणा-या कोणत्याही कम्पनिला त्यांचे उत्पादन बाजारात विकताना ते शाकाहारी किंवा मांसाहारी असल्याची माहिती देने आवश्यक आहे.

           या करिता मांसाहारी उत्पादनाच्या प्रत्येक पॅकिंगवर लाल बिंदु कोड अंकित केल्या जातो.तर शाकाहारी श्रेणितील उत्पादनावर हिरवा बिंदु अंकित केल्या जातो.सगुना फूड्स कंपनीने मात्र आपल्या शाकाहारी असलेल्या सोयाबीन तेलाच्या उत्पादनावर हा लाल ठिबकाच अंकित केल्याने बाज़ार पेठेत ग्राहक व विक्रत्यामध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.

       सगुना फूड्स या कंपनीच्या मदर्स डिलाइट हे खाद्य तेल बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे,हे तेल संपूर्णतः शाकाहारी असल्याच्याही दावा कंपनीने केला आहे.आमच्या प्रतिनिधिने स्थानिक बाजारपेठेत माहिती घेऊन ग्राहकांच्या व विक्रत्यांच्या प्रतिक्रिया घेतला असता विक्रेत्यांना ग्राहकानी या खाद्य तेल्याच्या पॅकेजिंगवर अंकित केलेल्या लाल ठिपक्यांच्या कोडमुळे विचारना करुंन भांबावून सोडले आहे.

         लाल ठिपक्यांच्या कोड मार्कमुळे यात मांसाहारी पदार्थाचा अंश तर नाही ना?असा संभ्रम ग्राहकांमध्ये निर्माण झाला आहे.सगुना कंपनीच्या मदर डिलाइट या सोयाबीन खाद्यपदार्थ तेलाची स्थानिक बाजारपेठेत मोठी हिस्सेदारी असून 15 लीटर टब जार संबंधात हा प्रकार घडला आहे.

        जवळपास 10 हजार टब जार बाजारपेठेत विक्रिसाठी उपलब्ध करुन देण्यात आल्या असल्याची खात्रिशिर माहिती मिळाली असून शाशनाच्या अन्न व अवषध प्रशासनाने सुद्धा या संबंधात कार्यवाही केली आहे.

       भारतीय अन्न सुरक्षा व मानक प्राधिकारन्याच्या नि यमांचे कंपनीने उल्लंघन केले असून कंपनीचे महाव्यवस्थापक जानकीरमन यांनी मात्र ही किरकोळ चूक असल्याचे सांगितले आहे.

       उपरोक्त खाद्यतेलाचा पुरवठा आमच्या कंपनीच्या वतीने करण्यात आला,आमच्या वितरकाकड़ूंन बाजारपेठेतील उपलब्ध तेल संबंधात होना-या कारवाई बाबत जबाबदारी सुद्धा कम्पनिचिच असल्याची त्यांनी माहिती दिली.

       कंपनीने चुकिने निर्देश असलेला हा साठा बाजारपेठेतुन परत मागविला असला तरी यातील बराचसा साठा बाजारपेठेत विकल्या गेला असल्याची खात्री आहे.