जांभूळखेडा (आंबेटोला)घाटावर अवैध रेतीची वाहतूक करताना २ ट्रेक्टर जप्त… — वन विभागाची कार्यवाही…

      राकेश चव्हाण

 तालुका प्रतिनिधी कुरखेडा 

          जांभूळखेडा नजीक असलेल्या आंबेटोला सती नदीचा घाटावरून काल मध्यरात्रि अवैध पणे रेतीची वाहतूक करताना २ ट्रेक्टर वनविभागाचा पथकाला आढळून आल्याने दोन्ही ट्राली सह ट्रेक्टर जप्त करीत वनविभागाचा डेपो मध्ये जमा करण्यात आले आहे.

            कूरखेडा वनपरिक्षेत्र अधिकारी मनिषा कूंभलकर याना जांभूळखेडा आंबेटोला सतीनदीचा घाटावरून अवैध पणे रेतीचा उपसा करण्यात येत असल्याची गोपनीय माहीती मीळताच‌‌ कूंभलकर यानी वनकर्मचार्यांची चमू गठीत करीत काल रात्रि १२ वाजेचा सूमारास पथकाला रवाना केले.

            यावेळी घाटावर दोन ट्रेक्टर अवैध रेतीची वाहतूक करताना आढळून आले त्याना थांबवत त्यांचाकडे वाहतूकीचा वैध परवाना बाबद चौकशी केली.मात्र वैध परवाना आढळून‌ न आल्याने दोन्ही ट्रेक्टर व घमेले पावळे‌ जप्त करण्यात आले.ट्रेक्टर जांभूळखेडा येथीलच येनीदास कवरके व निकेश बोदेले यांचा मालकीचे असल्याची माहिती आहे .

          सदर कार्यवाही वनपरिक्षेत्र अधिकारी मनिषा कूंभलकर यांचा मार्गदर्शनात क्षेत्र साहायक एस एल शेंडे, क्षेत्र साहायक एम एम सालोरकर, क्षेत्र साहायक दूधबळे, वनरक्षक कूमरे यांचा चमूने केली.