कंत्राटदार विनोद ढाकुणकरांचा अपघात करणाऱ्या सतीश जाधवांची कसून चौकशी व्हावी.. — इनोव्हा कारने दुचाकीला दिली जब्बर धडक,कार घटनास्थळावरुन केली गायब,आरोपीला वाचवण्याचा दिसतो प्रयत्न… — सहगृहस्थाचा व प्रेमळ व्यक्तीचा अपघात… — आरोपीला वाचवण्यासाठी धडपडणारा कोण?

प्रदीप रामटेके

  मुख्य संपादक 

         कंत्राटदार तथा काँग्रेस पक्षातंर्गत चिमूर नगरपरिषदचे माजी नगरसेवक असलेल्या विनोद ढाकुणकरांचा अपघात भाजपाचे पदाधिकारी व माजी नगरपरिषद सभापती सतिश जाधव यांनी केला असल्याने त्यांची सर्व स्तरावरुन चौकशी व्हायला पाहिजे असाच अपघात घटनाक्रम आहे.

            काँग्रेसचे माजी तालुका अध्यक्ष संजय घुटके यांच्या मुलीच्या विवाह सोहळ्यास विनोद ढाकुनकर यांनी उपस्थिती दर्शवून दुपारी ३ वाजताच्या सुमारास ग्रामगीता कॉलेज येथे प्रवेश गेटचे बांधकाम बघण्यासाठी गेले असता परत येतांना कॉलेजच्या अगदी समोरील चिमूर उमरेड जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग ३५३ ई वर TVS कंपनीच्या जुपिटर दुचाकी क्रमांक.MH 34 BD 3128 बाईकला टोयोटा कंपनीच्या इनोव्हा कारने दुचाकीला मागून जबर धडक मारल्याने दुचाकी वाहन चालक विनोद ढाकुणकर गंभीर जखमी झाले.

             विनोद ढाकुणकर यांना तात्काळ चिमूर येथील डॉ.दिलीप शिवरकर यांच्या खाजगी रुग्णालयात प्राथमिक उपचारार्थ दाखल करण्यात आले.डॉक्टरांनी वेळ न दवडता प्रथमदर्शी त्यांच्यावर उपचार केले व डोक्याला जबर मार असल्याने पुढील उपचारासाठी नागपूर येथे हलविण्यात आले.

         तसेच इनोव्हा कार वाहन चालक गोलू उर्फ सतीश जाधव हे माजी नगरसेवक तथा सभापती आहेत.याचबरोबर भाजपचे आमदार बंटी उर्फ किर्तीकुमार भांगडीया यांचे ते अत्यंत विश्वासू भाजप कार्यकर्ते आहेत.

           अपघात होताच सतिष जाधव यांनी स्वतःची इनोव्हा चारचाकी वाहन घटनास्थळावरुन गायब केले असल्याची जोरदार चर्चा असून अपघात करणाऱ्या सतिश जाधवांना कोण संरक्षण देत आहे? आणि कोण वाचवत आहे? याची सखोल चौकशी चिमूर पोलिसांनी केली पाहिजे असे जनमानसांचे मत आहे‌.

        तद्वतच घटनास्थळावरुन अपघातग्रस्त वाहन गायब करुन आरोपीने घटनाक्रमाला बघल देण्याचा गंभीर प्रयत्न केला असल्याने,चंद्रपूर पोलिस अधीक्षकांनी स्वतः सदर अपघात प्रकरणाकडे लक्ष केंद्रित करुन चिमूर पोलिसांच्या अपघात चौकशी प्रकरणाकडे व भुमिकांकडे जातीने लक्ष दिले पाहिजे असेच अपघात प्रकरण आहे.

         तसेच दुचाकी चालक विनोद ढाकुनकर हे सतीश वारजूकर यांचे निकटवर्तीय असून माजी नगरसेवक आहेत.

        या घटनेमुळे भाजपा व काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये तर्कवितर्कांना उधाण देणारी चर्चा रंगली आहे.

            अपघातानंतर चिमूर पोलिसांनी आरोपींला अटक केली नसून इनोव्हा कार सुध्दा जप्त केली नाही.बयानात वेळ घालवण्यापेक्षा चिमूर पोलीसांनी तपासाची चक्रे सखोल चौकशीकडे वळवावी असे अपघातग्रस्तांच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे.

          मात्र,विनोद ढाकुणकर यांच्या अपघाताच्या प्रकरणाकडे दुर्लक्ष केल्यास गृहमंत्री देवेंद्र फडणवीस व विरोधी पक्षनेते ना.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्याकडे अपघात प्रकरण वळण घेण्याची शक्यता आहे.

     एका सद्गृहस्थ व प्रेमळ व्यक्तीचा अपघात अनेकांच्या मनाला चटका लावून गेला.