Home Social राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती दिनानिमित्त ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानाचे...

राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती दिनानिमित्त ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानाचे आयोजन…

     सुधाकर दुधे 

सावली तालुका प्रतिनिधी 

सावली : राष्ट्रपिता महात्मा गांधी आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, सावली येथील राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात अले दिनांक १ ऑक्टोबर रोजी “स्वच्छता ही सेवा” या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

          या उपक्रमांतर्गत NSS स्वयंसेवकांनी महाविद्यालय परिसरात स्वच्छता करून विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती केली.कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. ए. चंद्रमौली यांनी श्रम हे मानवी जीवनाचे आणि समाजाच्या प्रगतीचे अविभाज्य अंग आहे. कष्टाशिवाय कोणतीही उपलब्धी शक्य नाही आणि त्यामुळेच प्रत्येक व्यक्तीने श्रमाचे महत्त्व ओळखून आपले जीवन अर्थपूर्ण बनवले पाहिजे असा संदेश विद्यार्थ्यांना दिला. 

             दिनांक २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या दिवशी गांधीजींच्या आवडत्या भजनांचे सादरीकरण करण्यात आले. प्रा.सोनटक्के सर अणि श्री.अमोल पिगलवार यांनी सुरेल भजन सादरीकरण केले विद्यार्थ्यांनी व स्वयंसेवकांनी एकतेचा आणि अहिंसेचा संदेश देत गांधी-शास्त्री यांच्या विचारांना वंदन केले.

          कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्राचार्य डॉ. ए. चंद्रमौली यांनी भूषविले. त्यांनी विद्यार्थ्यांना गांधीजींच्या विचारांचा अंगीकार करून समाजहिताचे कार्य करण्याचे आवाहन केले. कार्यक्रम अधिकारी श्री. देवीलाल वाताखरे आणि डॉ. राजश्री मार्कंडेवार यांनी NSS च्या माध्यमातून स्वच्छतेचे आणि सेवाभावाचे महत्त्व अधोरेखित केले.

          या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन NSS विभागाने केले असून विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग लक्षणीय होता. सदर कार्यक्रमाला सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी हे उपस्थित होते.