जि.प.शाळा असदपूर येथे स्वच्छता अभियान.

 

युवराज डोंगरे/खल्लार

     उपसंपादक

       महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त 1 व 2 ऑक्टोबर रोजी खल्लार नजिकच्या असदपूर येथील परिषद प्राथमिक मराठी शाळेत स्वच्छता अभियान राबविण्यात आले होते.

           या कार्यक्रमासाठी गावातील प्रमोद नितनवरे यांनी संपूर्ण परिसर स्वतः स्वच्छ करून, संपूर्ण गावासमोर एक उत्तम उदाहरण प्रस्तुत केले. प्रमोद नितनवरे हे गेल्या काही वर्षांपासून निस्वार्थीपणे संपूर्ण ग्राम परिसरामध्ये स्वच्छता अभियान राबवत असतात, त्यांच्या याच निस्वार्थी कार्याची दाखल घेऊन असदपूर ग्रामपंचायत तर्फे 15 ऑगस्टला भव्य सत्कार करण्यात आला होता.सोबतच अचलपूर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांनी सुद्धा त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.