तरुणांनी महात्मा गांधीचे विचार समजून घेणे ही आजच्या काळाची गरज आहे :- मायाताई वाकोडे

 

युवराज डोंगरे/खल्लार 

      उपसंपादक

            छत्रपती शिवाजी कला महाविद्यालय आसेगाव पूर्णा येथे दि. 02 ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय सेवा योजना पथकाच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 154 वी जयंती व लालबहादूर शास्त्री यांची 119 वी जयंती साजरी करण्यात आली. सर्वप्रथम दोन्ही महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक मायाताई वाकोडे , माजी मुख्याध्यापिका स्वामी सतरमदास कनिष्ठ महाविद्यालय, व संत कवराम उच्च माध्यमिक विद्यालय अमरावती या उपस्थित होत्या

          या प्रसंगी मायाताई वाकोडे यांनी महात्मा गांधी यांच्या भजनाने सुरुवात केली, महात्मा गांधी पूर्वीचा भारत व महात्मा गांधी नंतरचा भारत कसा होता तसेच महात्मा गांधी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि पंडित जवाहरलाल नेहरू त्यांच्याशिवाय आजही भारत ओळखल्या जात नाही.

         महात्मा गांधी यांचे विचार आजच्या तरुण पिढीला समजून घेणे आवश्यक आहे.आजच्या तरुण पिढीचे वाचन कमी होत आहे वाचनाची आवड निर्माण करणे तरुण पिढीसाठी आज आवश्यक आहे. त्याशिवाय महात्मा गांधी यांचे विचार तरुणांना समजणार नाही.

          महात्मा गांधी यांच्यावर आज जाहीरपणे टीका होत आहे इतकी टीका कोणावर होत नाही. महात्मा गांधी यांचा भगवतगितेवर विश्वास होता. भारतातील प्रत्येक खेडे स्वयंपूर्ण झाले पाहिजे हे त्यांचे स्वप्न होते.महात्मा गांधी यांची तुलना करायची झाली तर भगवान महावीर गौतम बुद्ध अशा धर्म संस्थापकांशी करावी लागेल. विसाव्या शतकात सामान्य माणसाप्रमाणे या भूतलावर वावरणारा हा महान मनुष्य ज्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिला त्या लोकांना सुदैवी म्हणावे लागेल असे प्रतिपादन केले.

          या कार्यक्रमाचे भारताबाहेरील अनेक व्यक्ती आणि अनेक देशात त्यांचा प्रभाव होता अजूनही आहे. भारताचे स्वातंत्र्य शांततेने जिंकून म. गांधींनी जगभरातील इतिहासाचा मार्ग बदलला भारतात दिनदिलतांना मानसन्मान मिळवा म्हणून अनेक दृष्टिकोन दिले स्व:ता स्वच्छतेला वाहून घेतले.

          भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री जय जवान जय किसान हा नारा दिला आज देशात शेतकऱ्यांची काय स्थिती आहे हे आपण पाहतच आहे ते साधे सरळ पण ठाम विचारांचे होते, पुढे आयुष्यभर एक तत्वनिष्ठ राजकीय नेता म्हणून जगले. मुळातच सत्यशील विनयशील व स्वच्छ चरित्राचे नेते अशी ओळख असलेल्या शास्त्रीजींनी रेल्वे अपघाताची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा देण्याची कृती इतकी वेगळी होती की तो प्रभाव आजही कायम आहे असे प्रतिपादन केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.हनुमंत लुंगी उपस्थित होते.

         या कार्यक्रमाचे आयोजन सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. आशिष काळे यांनी केले. प्रास्ताविक प्रा. विपिन लिल्हारे यांनी केले, आभार कु. साक्षी कैथवास हिने केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरता डॉ.रवींद्र इचे डॉ.प्रवीण सदार शिक्षकेतर कर्मचारी राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.