रिपब्लिकन विचारांची कास धरल्याशिवाय राजकीय प्रगतीचा मार्ग गवसणार नाही :- चरणदास इंगोले…

 

युवराज डोंगरे/खल्लार

    उपसंपादक

         रिपब्लिकन चळवळीतील राजकीय दृष्ट्या 1998 च्या लोकसभा निवडणुकीतील रिपब्लिकन पक्षाला प्राप्त झालेले अभूतपूर्व यश अपवाद वगळता आज पर्यंत राजकारणातील विविध प्रकारचे सर्वच फंडे वापरून सुद्धा समाजाच्या दृष्टीने अपेक्षित असे राजकीय सत्ता प्राप्तीचे ध्येय गाठण्यास आपण यशस्वी होऊ शकलो नाही.यासाठी राजकारणातील विखुरलेपणा जेवढा जबाबदार आहे तेवढाच रिपब्लिकन विचारांशी केल्या जात असलेली प्रतारणा हे देखील त्यापेक्षा जास्त जबाबदार आहे . तेव्हा खरंच आपल्याला सत्तेचा सारीपाट गाठायचा असेल तर एकसंघीयपणे रिपब्लिकन विचारांची कास धरल्याशिवाय गत्यंतर नसून त्याशिवाय राजकीय प्रगतीचे ध्येय गाठणे शक्य होणार नाही असे रोखठोक प्रतिपादन पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशचे कार्याध्यक्ष चरणदास इंगोले यांनी रिपब्लिकन पक्षाच्या वर्धापन दिनी आसेगाव पूर्णा येथे बोलताना केले आहे.

           रिपब्लिकन पक्षाच्या 66 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून 3 ऑक्टोबर पासून अमरावती जिल्ह्यात चरणदास इंगोले यांच्या नेतृत्वात रिपब्लिकन विचारधारेच्या सन्मानार्थ पीपल्स रिपब्लिकन पार्टी द्वारा सुरू करण्यात आलेल्या रिपब्लिकन गजर पंधरवड्याच्या पार्श्वभूमीवर 3 आक्टोंबर 2023 मंगळवार रोजी दुपारी दोन वाजता बुद्ध विहार आसेगाव पूर्णा येथे रिपब्लिकन गजर सभा घेण्यात आली. चरणदास इंगोले यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या रिपब्लिकन गजर सभेला जिल्हाध्यक्ष विलास पंचभाई, जिल्हा उपाध्यक्ष जानराव वाटाणे, जिल्हा नेते भास्कर वराडकर, यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्वप्रथम तथागत गौतम बुद्ध व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यांना पुष्प व पुष्पहार अर्पण करून व निळ्या ध्वजास अभिवादन करण्यात आले.

          रिपब्लिकन गजर च्या अनुषंगाने घेण्यात आलेल्या या रिपब्लिकन गजर सभेमध्ये रिपब्लिकन चळवळीतील योगदान देणाऱ्या सौ निर्मलाताई दशरथ तायडे, आसेगाव पूर्णा अशोकराव मोरे ,श्रीराम मोरे (चौसाळा )मनोहर वानखडे आसेगाव, काशिनाथ वानखडे जसापुर पंजाबराव नितनवरे,असदपूर या प्रामाणिक व निष्ठावंत रिपब्लिकन कार्यकर्त्यांना पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष चरणदास इंगोले यांच्या हस्ते मी रिपब्लिकन सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

         यावेळी चांदूरबाजार तालुकाध्यक्ष अरुण तंतरपाळे, जिल्हा सचिव प्रमोद नितनवरे, अचलपूर तालुका अध्यक्ष श्रीकृष्ण पळसपगार ,तालुका उपाध्यक्ष कैलास पाखरे ,पंजाब नितनवरे असदपूर ,दशरथ तायडे आसेगाव, बाबुराव थोरात महिमापूर, के .डी.वानखडे जसापुर, कैलास गवई सलाम भाई आसेगाव ,अशोक मोरे श्रीराम मोरे चौसाळा ,कृष्णा पाटील चांदूर बाजार, गजानन वाघमारे असदपूर ,मनोहर वानखडे वासुदेव गवई आसेगाव ,प्रल्हाद इंगळे टाकरखेडा ,राजेंद्र धाकडे सावळी ,रमण पाटील गोवर्धन मोहने निंभारी, सुरेश बहादुरे, निदान थोरात ,अशोक भोरगडे, गणेश वानखडे, कृष्णापुर पी .एम.वानखडे यांचे सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. सभेचे सूत्र संचालन चांदूरबाजार तालुका अध्यक्ष अरुण तंतरपाळे यांनी केले तर बाबूराव थोरात यांनी आभार मानले.