अजित पवारचं पुण्याचे दादा, चंद्रकात पाटील यांची उचलबांगडी, अजित पवार पुण्याचे नवे पालकमंत्री, दबाव तंत्र यशस्वी…

दिनेश कुऱ्हाडे

उपसंपादक

          पुणे – अजित पवारचं पुण्याचे दादा असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालंय. चंद्रकात पाटील यांची उचलबांगडी करत अजित पवार यांना पुणे जिल्ह्याचं पालकमंत्री बनवण्यात आलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील ११ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारीत यादी आज जाहीर केलीय. ही यादी पाहून सरकारमध्ये अजित पवार गटाचं दबाव वाढत असल्याचं दिसतं आहे. अजित पवार गटातील सात नेत्यांना पालकमंत्री बसवण्यात आले आहे. 

          अजित पवार यांचे दबाव तंत्र यशस्वी झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झालीय. पालकमंत्रीपद आणि रडखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावरून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार महायुती सरकारवर नाराज होते. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला न जाणं गणेशोत्सवात वर्षा बंगल्यावर न जाणं या गोष्टींतून अजित पवारांची नाराजी सहज दिसून येत होती. 

         दरम्यान अजित पवार आपल्या गटासोबत जेव्हा शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले, तेव्हापासून त्यांनी आपला दबदबा कायम ठेवल्याचं दिसत आहे. सत्तेत सामील होताच त्यांच्या गटातील नेत्यांच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ टाकली. आता पुण्याच्या पालकमंत्री पदी झालेली त्यांची नियुक्ती.

शिंदे- फडणवीसांना पळवलं

           सत्तेत सामील झाल्यापासून पुण्याचं पालकमंत्रीपद आपल्याकडे असावं, यासाठी अजित पवार आग्रही होते. त्यांचा हाच आग्रह त्यांच्या नाराजीचं कारण असल्याचं सांगितलं जात आहे. येत्या ७ दिवसांत पालकमंत्रीपदाचा तिढा सोडवा, असा अल्टिमेटम अजित पवार गटाने महायुतीला दिला होता. काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला दांडी मारत शिंदे-फडणवीस सरकारचं टेन्शन वाढवलं.

           अजित पवार यांची नाराजी सरकारसाठी डोकेदुखी ठरू नये म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तातडीनं दिल्ली गाठली आणि केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांची भेट घेतली. यावेळी तिन्ही नेत्यांमध्ये तब्बल दीड तास पालकमंत्रीपदाचा तिढा या विषयावर चर्चा झाली.