अटल अर्थसहाय्य योजनेअंतर्गत अशासकीय सदस्यपदी नियुक्तीसाठी अर्ज आमंत्रित…

 

ऋषी सहारे

संपादक

     गडचिरोली, दि.०४ : सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या ०२ जाने. २०१९ रोजीच्या शासन निर्णयान्वये सहकारी संस्थांसाठी अटल अर्थसहाय्य योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत जिल्हास्तरीय समितीमधील नवीन अशासकीय सदस्यांची नियुक्ती करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत.

       तरी गडचिरोली जिल्ह्यातील शासकीय व अर्ध शासकीय आस्थापनेवर / संस्थांवर कामकाजाचा अनुभव असणाऱ्या सेवानिवृत्त व विविध क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींनी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, गडचिरोली, बॅरक क्रमांक १, जिल्हाधिकारी संकुल, पोलीस मुख्यालयासमोर, क्वॉम्प्लेक्स, गडचिरोली येथे अर्ज सादर करावे. अधिक माहितीसाठी ९९२३३९१३०० या क्रमांकावर संपर्क करावा, असे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, गडचिरोली यांनी कळविले आहे.