उपक्षम रामटेके
मुख्य कार्यकारी संपादक
“पंतप्रधान नरेंद्र मोदी एप्रिलपर्यंत थांबा,तुमच्या दोन रिल्स बाहेर काढल्याशिवाय आम्ही राहणार नाही,एवढं लक्षात घ्या,त्या रिल्स येऊ द्यायच्या नसतील तर नरेंद्र मोदी यांनी खुर्ची खाली करावी असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड.प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे.
भाजपने भारताचे सार्वभौम टिकवण्यासाठी नरेंद्र मोदी यांना पायउतार करावे लागेल”, असं वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केलंय.
“पंतप्रधान नरेंद्र मोदी एप्रिलपर्यंत थांबा.तुमच्या दोन रील्स बाहेर काढल्याशिवाय आम्ही राहणार नाही,एवढं लक्षात घ्या.त्या रील्स येऊ द्यायच्या नसतील तर,नरेंद्र मोदी यांनी खुर्ची खाली करा,तर रील्स थांबवतो.
आमच्या पुढे दोनच मार्ग आहेत.एक तर देशाला वाचवा,ते जर करायचे असेल तर,तुम्हाला संपवा.तुम्हाला इज्जत वाचवायची असेल तर,तुम्ही खुर्ची खाली करा.आम्ही सगळं बघून घेऊ.”
आम्ही भाजपचा राजीनामा मागत नाही.सत्ता तुमचीच राहणार आहे.लोकांनी तुम्हाला पाच वर्षांसाठी निवडणूक दिंल आहे.तुम्ही काय निवडणूक घेणार नाही.सत्ता तुमच्या राहाताना,भारताचे सार्वभौम टिकवण्यासाठी भाजपला नरेंद्र मोदी यांचा बळी द्यावाच लागेल,एपस्टीन फाईल्स मध्ये देखील पंतप्रधानांचे नाव आलं आहे.असेही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले.
देश विकायला निघालेल्या अकार्यक्षम,चारित्र्यहीन प्रधानमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा,देशाला सक्षम,कार्यक्षम,चारित्र्यवान नेतृत्वाची गरज आहे,ट्रम्पच्या इशाऱ्यावर नाचणाऱ्याची नाही,हे मुंबईत झालेल्या आंदोलनातून बाहेर आले आहे.


