जीवन आधार फिरता दवाखाना व काठी वाटप उपक्रम चे मोठ्या थाटात उद्घाटन… — आई वडील यांच्या लग्नाच्या वाढदिवस निमित्त गोर गरीब यांच्या सेवे करीता देण्यात आला फिरता दवाखाना भेट.. — मान्यवर च्या उपस्थित माधान येथे करण्यात आले रुग्णवाहिका,फिरता दवाखाना व काठी वाटप चे वितरण…

 

रत्नदिप तंतरपाळे/चांदूर बाजार तालूका प्रतिनिधी

  चांदुर बाजार तालुक्यातील येत असलेल्या श्री क्षेत्र माधान या गावामधील बहीण भाऊ व जीवन आधार सामाजिक संस्थेच्या संयुक्त विद्यमाने वेगळ्या पद्धतीने आपल्या वडील रमेशराव जवंजाळ व आई सुरेखाताई जवंजाळ यांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्त फिरता दवाखाना लोकार्पण करण्यात आले ज्या माय माऊली ने जन्म दिला त्या माय माऊली चा लग्नाचा वाढदिवस आपण वेगळा पद्धतीने करू असे जीवनराव जवंजाळ , धीरजराव जवंजाळ, व अंजलीताई गाडगे यांना वाटले त्यांनी जीवन आधार सामाजिक संस्थेच्या माध्यमातून सेवा देण्यासाठी ग्रामीण भागात होत असलेल्या गैरसोय मध्ये रात्री बेरात्री उपचार लागल्यास दवाखाना उपलब्ध राहत नाही म्हणून ज्या गावामध्ये आपला जन्म झाला त्या ठिकाणी आपण गोर गरीब अपंग अनाथ बेघर आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंब चिमुकल्या मुलांसाठी फिरता दवाखाना आपल्या आई वडिलांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त देऊ असे ठरवण्यात आले त्या निमित्तत्याने आज माधान या गावी फिरता दवाखाना , रुग्णवाहिका व जीवन आधार सामाजिक संस्थे तर्फे जीवन आधार काठी वाटप संकल्पनेचे चे मोठ्या थाटात लोकार्पण करून उद्घाटन करण्यात आलेे.

      जीवन आधार काठी वाटप ची सुरुवात ही लोकांच्या रोजच्या 1रु वर्षांला 365 रु मदत देऊन गावा गावामध्ये वयोवृद्ध म्हातारे आजी आजोबा व अपंग व्यक्तीला देण्यात येणार आहे या उपक्रम ची सुरुवात जीवन आधार संस्थेचे संस्थापकअध्यक्ष जीवन जवंजाळ व सहसचिव सुयोग गोरले यांनी केली यांनी केली आहे त्या बरोबर मान्यवर च्या उपस्थित मध्ये श्री संत गुलाबराव महाराज माधान या ठिकाणी फिरता दवाखाना गाडी चे व रुग्णवाहिका चे पूजन करून फिरत्या दवाखाना चे गावामधून मिरवणूक काढून लोकार्पण करण्यात आले या मध्ये गावामधील नागरिक यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली फिरता दवाखाना लोकार्पण झाल्या नंतर माधान गावातील सर्व वयोवृद्ध म्हातारे आजी आजोबा व अपंग व्यक्ती ला सूंदर जीवन आधार सामाजिक संस्थे तर्फे जीवन आधार काठी वाटप करण्यात आले या उपक्रमाला उपस्थित गोरगरिबाचे कैवारी, संत गाडगेबाबा आश्रम नागरवाडी चे संचालक बापूसाहेब देशमुख ,बाबुरावजी जवंजाळ, गजाननराव पिसे पोलीस पाटील, राजेशराव गाडगे, माधवराव मोहोळ, जीवनराव जवंजाळ , धीरजराव जवंजाळ , भास्करराव मोहोळ सुधाकरराव मोहोळ, कोल्हे गुरुजी, बाळासाहेब मोहोळ, मनोरराव मोहोळ, भागवतराव गोरले आदी मान्यवर व गावातील प्रतिष्ठित नागरिक व जवंजाळ परिवार उपस्थित होते।  

प्रतिक्रिया 

चांदुर बाजार तालुक्यातील गोर गरीब अपंग अनाथ बेघर आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंब शालेय विद्यार्थी यांच्यासाठी जीवन आधार सामाजिक संस्थेच्या माध्यमातून नवनवीन उपक्रम आम्ही लवकर सुरू करू त्या मध्ये अपंग व्यक्तीला काठी म्हाताऱ्या लोकांना काठी, शालेय विद्यार्थ्यांना ट्युशन क्लासेस, रुग्णांना ॲम्बुलन्स घरपोच सेवा, बेघर घराला सहारा, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला मदत, बेरोजगाराला रोजगार, असे अनेक उपक्रम जीवन आधार सामाजिक संस्थेतर्फे राबवू असे मत जीवन जवंजाळ संस्थापक अध्यक्ष जीवना आधार, व सुयोग गोरले सहसचिव जीवन आधार यांनी दिले.