जलजीवन मिशन अंतर्गत साटक येथे पायाभरणीच्या भुमीपुजनाचा कार्यक्रम संपन्न…  – माजी मंत्री सुनील केदार व राजेंद्रजी मुळक जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष यांच्या हस्ते पार पडला भुमीपुजन कार्यक्रम..

कमलसिंह यादव 

  प्रतिनिधी

पारशिवनी:- रविवारला पारशिवनी तालुक्यातील मौजा साटक येथे जल जीवन मिशन अंतर्गत पायाभरणीचा भुमीपुजन सोहळा माजी मंत्री तथा सावनेर कळमेश्वर विधानसभा क्षेत्राचे आमदार सुनील केदार यांच्या हस्ते पार पडला.

       याप्रसंगी माजी मंत्री व ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेंद्रजी मुळक उपस्थित होते. 

      भुमीपुजनाचा कार्यक्रम माजी मंत्री श्री.सुनिलजी केदार व श्री.राजेंद्र मुळक(माजी मंत्री तथा अध्यक्ष नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी) याच्या हस्ते पार पडला.

     या प्रसंगी सौ.मुक्ताताई कोकड्डे (अध्यक्ष जि.प.नागपूर),श्री.चंद्रपाल चौकसे(पर्यटक मित्र),सौ.रश्मीताई बर्वे(माजी अध्यक्ष जि.प.नागपूर),कुंदाताई राऊत(उपाध्यक्षा जि.प.नागपूर),श्री.राजुभाऊ कुसुंबे(सभापती शिक्षण विभाग जि.प.नागपूर),श्री.व्यंकटराव कारेमोरे(जि.प.सदस्य),श्री.दुधारामजीसव्वालाखे(जि.प.सदस्य),सौ.अर्चनाताई दिपक भोयर(जि.प.सदस्य),श्री.सुनील रावत,श्री.नरेश बर्वे,कु.करूनताई भोवते (उपसभापती पं.स.पारशिवणी),सौ.मीनाताई कावळे (माजी सभापती पं.स.पारशिवणी),सौ.निकिताताई भारद्वाज(पं.स.सदस्य),श्री.नरेश मेश्राम(पं.स.सदस्य),श्री.दयारामजी भोयर(अध्यक्ष पारशिवणी तालुका काँग्रेस कमिटी) तरुण बर्बे(सरपंच ग्रा.पं. साटक), रविन्द गुडधे (उपसरपंच साटक),श्री.सीताराम भारद्वाज,श्री.रामभाऊ ठाकरे,श्री.प्रकाश डोमकी(माजी.सरपंच पारशिवणी).श्री.दीपक भोयर,श्री.दीपक भोयर,श्री.निखिल पाटील,श्री.संदीप यादव तसेच साटक ग्राम पंचायत चे सदस्य इतर गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.