नयाकुंड सूर्यअंबा कॉटन मिल कामगार प्रतिनिधी निवडणुकीत प्रहार कामगार संघाचे प्रणित कामगार पॅनल ला एकतर्फी यश.

कमलसिंह यादव 

  प्रतिनिधी

पारशिवनी:-सूर्यअंबा कॉटन मिल (आमडी फाटा)नयाकुंड पारशीवणी येथे झालेल्या कामगार प्रतिनिधी निवडणुकीत प्रहार कामगार संघाचे संस्थापक आणि प्रहार नागपूर जिल्हा प्रमूख रमेश कारामोरे आणि माजी युनियन लीडर झामेश्वर काकडे प्रणित कामगार पॅनल ला एकतर्फी यश आले आहे.

      तालुक्यातील नियमित,कंत्राटी स्वरूपाचा १५०० चे वर कामगार कार्यरत असलेल्या पारशीवणी तालुक्यातील सूर्यअंबा कॉटन मिल मध्ये झालेल्या कामगार प्रतिनिधी निवडणुकीत प्रहार नागपूर जिल्हा प्रमूख आणि प्रहार कामगार संघाचे संस्थापक अध्यक्ष श्री रमेश कारामोरे आणि कंपनीचे माजी प्रतिनिधी झामेश्र्वर काकडे यांचा नेतृत्वात कार्यरत असलेल्या कामगार निर्वाचित प्रतिनिधि सरीता चौरे,हर्षल मानापुरे ,शांताराम मामुळकर, राजेश वाहणे ,चरण राहांगडाले,हे निर्वाचित कामगार प्रतिनिधी यांनी पुन्हा एकदा भरघोस बहुमतांनी विजय मिळवला आहे.

      ५ ही कामगार प्रतिनिधी यांना पुन्हा कामगारांनी पसंती दर्शवली आहे.कार्यरत तत्कालीन प्रतिनिधी यांचा प्रयत्नाने पार पडलेल्या नियमित कंपनी व्यवस्थापन आणि कामगारांचा करारनाम्यात कामगारांचा हिताचा अनेक गोष्टी कंपनी व्यवस्थापनाकडून मान्य करवून घेत करारनाम्यात कामगारांना मोठा दिलासा मिळवून देण्यात आला होता. त्यामुळे कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात रमेश कारामोरे,झामेशवर काकडे यांच्या नेतृत्वात कार्यरत असलेल्या कामगार प्रतिनिधी यांना खंबीर साथ देत असल्याचे या निकालातून दिसून आले.

    यावेळी पाचही निर्वाचित प्रतिनिधि सरीता चौरे,हर्षल मानापुरे ,शांताराम मामुळकर, राजेश वाहणे ,चरण राहांगडाले,हे निर्वाचित कामगार प्रतिनिधी निकालाचा घोषणेनंतर कामगारांनी मोठ्या संख्येने रमेश कारामोरे , झामेशवर काकडे यांच्या नेतृत्वात जल्लोष करत विजयी मिरवणूक काढली.

       यावेळी रमेश कारामोरे यांनी कामगारांना संबोधित करताना आपण या पुढेही सदैव रामटेक विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक कामगारांसाठी व त्यांच्या न्यायासाठी सतत लढत राहणार असल्याचे सांगितले.

       आपल्या या भागातील प्रत्येक कामगार बंधू/भगिनी आपल्या कुटुंबातील सदस्य असून त्याचा हितासाठी लढणे हे आपण आपले कर्तव्य समजतो असे प्रतिपादन केले.

      निर्वाचित प्रतिनिधि सरीता चौरे,हर्षल मानापुरे ,शांताराम मामुळकर, राजेश वाहणे ,चरण राहांगडाले,हे निर्वाचित कामगार प्रतिनिधी सोबत प्रमोद तिवारी,सुनील राखडे ,दशरथ सेलोकर ,मंगेश थरमे ,नरेंद्र खंडाते ,संतोष विरोंकर सह सर्वच कामगार उपस्थित होते.

     यावेळी कंपनी व्यवस्थापनाचे वतीने सुद्धा कामगार प्रतिनिधी यांचे स्वागत करण्यात आले.