पालि आणि बुध्दीझम विभागातील पालि विषयात डॉ. वंदना दशरथ धोगडे यांना पीएचडी पदवी (आचार्य पदवी) प्रदान….

प्रितम जनबंधु 

   संपादक 

   डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथिल पालि आणि बुध्दीझम विभागातील पालि विषयात डॉ. वंदना दशरथ धोगडे यांना पीएचडी पदवी ( आचार्य पदवी ) प्रदान केली. त्यांनी प्रा. डॉ. नवनाथ गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ” तथागताचे उपट्टाक स्थविर आनंद ” एक चिकीत्सक अध्ययन या संशोधन विषयावर संशोधन प्रबंधन सादर केला. त्यांचे सहमार्गदर्शक म्हणून प्रा. डॉ. एस. एम. सोनोने सर विभाग प्रमुख वैशाली खापर्डे, व त्यांच्या मौखिक परिक्षेत चहिस्थ मार्गदर्शक म्हणून प्रा. डॉ. एम.टी. कुंभारे पालि आणि प्राकृत विभाग प्रमुख यांचे विशेष सहकार्य लाभले. 

सन १९ जाने २०१७ ला त्याचे पीएचडी रजिस्ट्रेशन झाले होते. व ऑगष्ट २०१८ ला वैशाली ( बिहार राज्य ) येथिल कुटागार शाळा या विहारात १ महिना श्रामणेरी दिक्षा घेऊन पुज्य भन्ते डॉ. धम्मसेवक महाथेरो यांच्या विशेष मार्गदर्शनात व थायलंडच्या भिक्कुनी विशुध्दीयाना व धम्मदिना यांच्या विशेष मार्गदर्शनात प्रत्यक्ष अनुभव घेवून अभ्यास केला. त्यांना विशेष सहकार्य करणारे भन्ते प्रीयदर्शी महाथेरो, प्रा.डॉ. भन्तेजी सत्यपाल महाथेरी, धनाजी मोहीते, प्रा. डॉ. कला वासनिक, प्रा. डॉ. अशोक केवटे सर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. 

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करुन व कठोर परिश्रम करुन त्यांनी हे यश प्राप्त केलेले आहे. ३१ डिसे. २०२२ रोजी त्यांना त्यांच्या मौखिक परिक्षेत विशेष यश प्राप्त झाले. त्यांच्या यशामागे व विशेष सहकार्यात त्यांची आई सुमनबाई व वडील दशरथ धोंगडे, डाकराम धोंगडे, लता शिंदे, वर्षा, प्रमोद नांदगावे, पुरुषोत्तम दुधे, राममोहन ब्राडीया, देविदास ऊके, नंदाताई बनकर या सर्व सहकारी व्यक्ती विषयी त्यांनी कृतज्ञता व्यक्त केलेली आहे.

         मणुष्य जन्म लाभल्यानंतर सत्धम्म काय आहे, याची जाणिव झाली. खरोखरच सर्व दुःखातुन मुक्त होण्याकरिता अष्टांगमार्गाचे पालन करुन जिवनयापन करावे. तथागताने सांगीतलेल्या मार्गाचे अनुसरण करावे, तथागताचा मार्ग खरोखरच निब्बाण सुखाचा मार्ग आहे. हे शाश्वत सत्य आहे. त्यांची प्रेरणा घेऊन त्यानुसार आचरण करुण दुःखमुक्त व्हावे, असा संदेशही त्या आपल्या प्रत्यक्ष अभ्यासाच्या अनुभवातून सांगतात.