EVM विरोधात… शेतकऱ्यांच्या सन्मानात बल्लारशा येथे ७ मार्चला विराट मोर्चा.. — १९ लाख ईव्हिएम मशीन गायब झाल्याच कशा? — बलत्काऱ्यांना व गुंड्यांना संरक्षण देणारे सरकार नकोय.. — “ईव्हिएम हटवा-लोकशाही वाचवा,”शेतकरी वाचवा-देश वाचवा‌.‌‌.‌‌

प्रदीप रामटेके

 मुख्य संपादक

        देशात महागाई, बेरोजगारी, शिक्षण, स्वास्थ्य, भ्रष्टाचार, गुंडागर्दी, बलात्कार, शेतकरी आत्महत्या,युवकांना काम देण्या ऐवजी नशेच्या आहारी दिल्या जात आहे.शेतमालावर निर्यात बंदी आणून केंद्रातील बीजेपीचे सरकार शेतकऱ्यांना आत्महत्येस प्रवृत्त करीत आहे. जनतेचे प्रश्न सोडविण्या ऐवजी जनतेचे हक्क हिरावून जनतेला संकटात टाकत आहे,याला कारण म्हणजे वर्तमान भाजप सरकारला EVM मध्ये मतांची हेराफेरी करून निवडून येण्याचा विश्वास आहे. 

         आज पर्यंत लोकांद्वारा निवडून आलेल्या सरकारने सामान्य माणसाचे जेवढे शोषण केले नाही त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक हे सरकार शोषण करीत आहे.विरोधी पक्षांची सरकारे हजारो करोड खर्च करून पाडल्या जात आहे. प्रश्न विचारणाऱ्या विरोधी पक्ष नेत्यांना ED,CBI व इन्कम टॅक्स ची भीती दाखवून त्रास दिल्या जात आहे तर काहींना जेल मधेही टाकले आहे.कारण बीजेपी ला EVM मॅनेज करून निवडून येण्याचा विश्वास आहे.

      १९ लाख EVM ची निवडणूक आयोगाच्या ताब्यातून चोरी केल्या गेली आहे.या EVM च्या माध्यमातून मतदान हेरफेर करून बीजेपी लोकशाही चे अपहरण करून सत्तेवर येत आहे. 

       तेव्हा देश,लोकशाही व भारतीय संविधानाला मोठा धोका निर्माण झाला आहे.जगातील कोणतेही लोकशाही राष्ट्र EVM नी निवडणुका घेत नाही. २००४ च्या निवडणुकीत EVM ला विरोध करणारी बीजेपी आता EVM चा व निवडणूक आयोगाचा दुरुपयोग करून सत्तेवर येत आहे व सामान्य नागरिकांना महागाईच्या खाईत ढकलून ओबीसी, एससी, एसटी, मायनारिटी चे संविधानिक व मानवीय अधिकार हिरावत आहे व देशात धार्मिक दंगे घडवीणाऱ्या RSS सारख्या संविधान व घटना विरोधी RSS च्या ईशाऱ्यावर काम करीत आहे.

      मागील दहा वर्षांपासून केंद्र सरकार मध्ये सत्तेवर असलेले बीजेपी सरकार लोकाहिताला बगल देऊन २०२४ मध्ये आगामी लोकसभेच्या निवडणुका EVM ने न घेता बॅलेट पेपर ने घ्याव्या यासाठी दिल्ली येथे हजारो वकील व नागरिक आंदोलन करीत आहे. या देशभक्त आंदोलकांना समर्थन देण्यासाठी व EVM हटाव व लोकशाही बचाव तसेच शेतकरी, युवा,बेरोजगार यांच्या विविध मागण्यांसाठी येत्या ७ मार्च २०२४ ला बल्लारपूर शहरातील काटा गेट ते तहसील ऑफिस पर्यंत सकाळी १० वाजता च्या दरम्यान शांतीपूर्वक संविधानिक मार्गाने निदर्शने आयोजित करण्याच्या आले आहे तरी सर्व जागरूक नागरिकांनी आपल्या हक्क अधिकारासाठी व लोकशाही वाचवण्यासाठी विराट मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

**

प्रमुख मागण्या..

• EVM द्वारे मतदान बंद करून बलेट पेपर वर घेण्यात यावे.

• शेतमालाला स्वामीनाथन आयोगा नुसार MSP मिळालाच पाहिजे.

— ओबीसी ची जातीनिहाय जनगणना झालीच पाहिजे.

• KG to PG शिक्षण मोफत देण्यात यावे.

***

आयोजक

भूमिपुत्र ब्रिगेड (बल्लारपूर विधानसभा क्षेत्र)

****

स्थळ : नवीन नगरपरिषद (काटा गेट) ते तहसील कार्यालय, बल्लारपूर अशाप्रकारे मोर्चेकरु प्रवाश करणार..