इंदापूर तालुका खरेदी विक्री संघाच्या चेअरमन पदी प्रताप पालवे यांची बिनविरोध निवड….

 बाळासाहेब सुतार

निरा नरसिंहपुर प्रतिनिधी

          ओझरे तालुका इंदापूर येथील विकास सेवा सोसायटीचे चेअरमन प्रताप ज्ञानदेव पालवे यांची इंदापूर तालुका खरेदी विक्री संघाच्या चेअरमन पदी बिनविरोध निवड झाली.

          जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे यांच्याच प्रयत्नामुळे हि निवड करण्यात आली.

          इंदापूर तालुक्याचे जाणते नेते व गोरगरिबांचा कैवारी पुणे जिल्हा बँक संचालक आप्पासाहेब जगदाळे यांचा विश्वासू कार्यकर्ता म्हणून ओळख आसलेले प्रताप ज्ञानदेव पालवे यांची तालुका खरेदी विक्री संघाच्या चेअरमन पदी निवड करण्यात आली या निवडी बद्दल संपूर्ण इंदापूर तालुक्यातून पालवे चेअरमनला शुभेच्छाचा वर्षाव होऊ लागला आहे. तसेच चेअरमन पदी निवड झाल्यास बद्दल नरसिंहपूर गिरवी, पिंपरी बुद्रुक, लुमेवाडी, गोंदी, गणेशवाडी, सराटी, बावडा, गिरवी, ओझरे, या सर्वच भागातील कार्यकर्त्यांकडून पालवे काका यांचा सत्कार होऊ लागला आहे. 

         निवडी प्रसंगी चेअरमन प्रताप पालवे बोलत आसताना म्हणाले की जिल्हा बँक संचालक आप्पासाहेब जगदाळे यांनी माझ्यावर विश्वास दाखवून माला खरेदी विक्री संघाच्या चेअरमन पदी निवड केल्याबद्दल त्यांचेही माझ्या पालवे कुटुंबाच्या वतीने मनःपूर्वक आभार मानतो आप्पासाहेबांच्या माध्यमातून मला जी दिलेली जबाबदारी असेल त्या जबाबदारीचे योग्य पालन करून खरेदी विक्री संघाचा विकास आप्पा साहेबांच्या सहकार्याने हे जोमाने केला जाईल चेअरमन प्रताप पालवे यांचे निवडी प्रसंगी उदगार.

          जिल्हा बँक संचालक आप्पासाहेब जगदाळे व खरेदी विक्री संघाचे सर्व संचालक मंडळ यांच्या उपस्थितीत ही निवड पार पाडण्यात आली.