लक्षवेधी…
प्रदीप रामटेके
मुख्य संपादक
चिमूर तालुक्यात जिकडे तिकडे अवैध व्यवसायाला तटबंदी आहे.यामुळे चिमूर तालुक्याला अवैध व्यवसायाच्या जाळ्यात कुणी ढकलले? हा चिंतेचा व चिंतनाचा विषय असला तरी त्यांना मिळत असलेले संरक्षण लाजीरवाणी बाब आहे.
चिमूर तालुक्यातील गोरगरीब व सर्वसाधारण नागरिकांना विचारपूर्वक व्यसनाधीन बनविण्याचा कुणीतरी निश्चित विडाच उचललेला असल्याचे दिसून येते.
तालुक्यात क्लबच्या नावावर चालणारे जुगारांचे अड्डे बऱ्याच सर्वसामान्य व सर्वसाधारण नागरिकांना नियोजन बद्ध पध्दतीने फाक करीत आहेत आणि त्यांना कर्जबाजारी बनविण्यासाठी कारणीभूत ठरत आहे.
याचबरोबर चिमूर तालुक्यातील लायसन्सधारक देशी दारुच्या दुकानातून ग्रामीण भागात रात्रंदिवस दारुचा पुरवठा केला जात असल्याचे स्थानिक ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
दारु सारख्या अवैध व्यवसायाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील तरुण,नागरिक,विद्यार्थ्यांनी भरपूर प्रमाणात मद्य सेवन करावे,ते मोठ्या प्रमाणात व्यसनाधीन बनावे,दारुच्या नादात दररोज दारु प्यावे,त्यांनी घरच्या समस्यांकडे दुर्लक्ष करावे,मद्यपींनी मुलांना शिक्षणापासून दूर ठेवावे,त्यांना उपजीविकेसाठी दररोज अन्न मिळू नये,त्यांच्या अंगावर चांगले कपडे दिसू नयेत,ते वनवन भटकावे व कंगाल बनावे हा उद्देश अवैधरित्या दारुचा पुरवठा करणेवाल्यांचा आणि दारुचा अवैध व्यवसाय करणेवाल्यांचा व त्यांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष साथ देणे वाल्यांचा दिसून येतो आहे.
याचबरोबर चिमूर तालुक्यात सट्टा व्यवसायीकांनी मोठ्या प्रमाणात डोके वर काढले आहे.यामुळे शहरांसह ग्रामीण भागात सट्टा व्यवसायीकांनी हजारो नागरिकांना आपल्या जाळ्यात ओढले आहे.
सट्ट्याच्या जाळ्यात अडकलेले नागरिक दिवसभर आपला मुल्यवान वेळ गमावून आर्थिक हानी करीत असल्याचे स्पष्ट आहे..
अवैध व्यवसायाच्या माध्यमातून होणारी सर्वसामान्य नागरिकांची मानसिक,शारीरिक,श्रमीक आणि आर्थिक हानी,हा अतिशय गंभीर प्रकारा मुद्दा आहे.याला जबाबदार कोण?


