शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
चिमूर तालुक्यातील मौजा वडसी ग्रामपंचायत कार्यालयात क्रांती ज्योती सावित्रीआई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले व दीपप्रज्वलन करून अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाप्रसंगी सरपंच अन्नपूर्णा मादाळे म्हणाले,सावित्रीआई फुले यांनी स्त्रियांच्या शिक्षणासाठी केलेले कार्य अतुलनीय आहे.त्यांनी समाजातील विषमतेविरुध्द लढा दिला आणि शिक्षणाचे दरवाजे सर्वांसाठी खुले केले.त्यांचे जीवनकार्य हे आजच्या पिढीसाठी प्रेरणास्थान आहे.
याप्रसंगी जयंती निमित्त वडसी ग्रामपंचायतच्या सरपंच अन्नपूर्णा हरिश्चंद्र मादांळे,पशुसखी वनिता रामटेके,ग्रामपंचायत सदस्य,कर्मचारी व गावातील नागरिक आवर्जून उपस्थित होते.



