शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
चिमूर तालुक्यातील सावरी (माकोना) ग्रामपंचायत कार्यालयात क्रांती ज्योती सावित्रीआई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
याप्रसंगी सरपंच लोकनाथ रामटेके,सुरेखा शेंबेकर,नलू शेंबडे,किरण मेश्राम,दिलीप डांगे,सुरेश मेश्राम,मारोती राऊत,प्रकाश हनवते,राजू वाकडे व इतर प्रतिष्ठित महिला पुरुष उपस्थित होते.
सरपंच लोकनाथ रामटेके यांच्यासह इतर सर्व पदाधिकाऱ्यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार व पुष्पगुच्छ अर्पण करुन अभिवादन केले व त्यांचा कार्यावर प्रकाश टाकला.



