निमगावात काकड आरतीची सांगता…

 भाविक करमनकर

धानोरा तालुका प्रतिनिधी 

     श्री गुरुदेव सेवा सत्संग सेवा मंडळ निमगाव व समस्त निमगाव रांगी ग्रामवासयाच्या संयोगाने काकड आरतीची सांगता व राष्ट्रसंतांची पुष्प तिथी सोहळा पार पडला.

        निमगाव येथील हनुमान मंदिरात मागील अनेक वर्षापासून काकड आरती पहाटे पाच ते साडेसहा या कालावधीत होत असते या काकड आरतीचा पर्व कोजागिरी पौर्णिमा ते त्रिपुरारी जयंती असा असतो.

        या काकड आरतीला मींगरकर महाराज केशव मेश्राम, पांडुरंग मेश्राम, लालाजी जाळे, मुरलीधर कुळमेथे,  वासुदेव शेळमाके,  यशवंत शेडमाके, दिलीप वासेकर पत्रु जुवारे,  हेमराज चापले, बाबुराव होळी, प्रमोद बोबाटे,  विश्वनाथ वरखडे, आनंदराव वरखडे, तुळशीदास कुकुळकर, चेतन सुरपाम, मनीराम वरखडे, अशोक वरखेडे, सहभागी होत असतात.

           या काकड आरतीचा समारोप व राष्ट्रसंताच्या मुख्य तिथीचा योग जणू दुग्ध शर्करा योग दिनांक 29/11/2023 सायंकाळी सहा वाजता घटस्थापना व सामूहिक प्रार्थनेने सुरू करून रात्री भजन कीर्तन व पहाटे 30/11/ 23 ला ध्यान ग्रामसफाई साडेनऊ वाजता ध्वजारोहण महाराजांच्या मूर्तीला पुष्प माला अर्पण व चार वाजता गोपालकाला आणि सायंकाळी सहभोजन करून सांगता करण्यात आली.

         यावेळी जिजाबाई मेश्राम, शकुंतला मींगरकर, शोभाबाई मेश्राम, यशोदाबाई वरखडे, बारूबाई कुमरे तसेच संपूर्ण गावकरी मंडळी व स्त्री पुरुष सहभागी झाले होते.